लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जि. प. कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून विविध प्रलंबित मागण्यांकरिता आंदोलन करत आहेत. चंद्रपूर जि. प. कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान, राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या उपस्थितीत नुकतीच मंत्रालयात बैठक झाली.जि.प. कर्मचारी युनियन राज्यध्यक्ष बलराज मगर, लेखा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सूर्यवंशी व आरोग्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरूण खरमाटे यांच्या शिष्टमंडळाने समस्यांकडे लक्ष वेधल्याने सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.रोहयो पंचायत समितीस्तरावर लेखा अधिकारी पदाला पूणर्जिवीत करणे, महाराष्ट्र विकास सेवा तीन नवीन सेवाशर्तींचे गटविमा योजना वर्गणी वाढविणे, एनपीएस स्लीप मिळणे, अनुकंपा भरती, आरक्षित पदावर आवश्यक त्याठिकाणी नवीन आकृतीबंद मंजूर करणे, बालविकास प्रकल्प अधिकारीपदावर जि.प. कर्मचाºयांची पदोन्नती, सहाय्यक लेखाअधिकाऱ्यांना राजपत्रित दर्जा देणे, निलंबित कर्मचाºयांच्या चौकशी अधिन राहून तीन महिन्यांच्या आत रूजू करून घेणे, प्राथमिक आरोग्य केंद्रावर दोन आरोग्य सहाय्यता अर्धवेळ परिचारिकांचे मानधन वाढवावे.२२४ विस्तार अधिकाऱ्यांची पदे पुन्हा जिल्हा परिषदकडे देणे व चारस्तरीय विकास श्रेणी आवश्यकतेनुसार सुधारीत आकृतीबंद तसेच जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या इतर सर्व मागण्यांवर चर्चा झाली. मुख्य सचिव जैन यांनी सर्व प्रलंबित समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.बैठकीला आरोग्य कर्मचारी संगठनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गौरकार, जि.प. लघु वेतन कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सूर्यभान किसन माणूसमारे, महाराष्ट्र जि.प. कर्मचारी युनियन अध्यक्ष विनेश रामानूजमवार, अशोक संगीडवार, लक्ष्मीकांत कलपल्लीवार, मुर्लीधर मेश्राम, प्रवीण बावणे, सहाय्य लेखाधिकारी अतुल आंबटकर, अजय डोर्लीकर, महेश अॅगलवार, उमाकांत पिंपळशेंडे, धिरज जांभुळे, रामभाऊ रायपूरकर व महिला प्रतिनिधी सिंधू बन्सोड, कुंदा शेडमाके, दुर्गा ठाकरे, गीता मडावी, सत्यवती धोटे आदी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांच्या समस्या सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 00:38 IST
जि. प. कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून विविध प्रलंबित मागण्यांकरिता आंदोलन करत आहेत. चंद्रपूर जि. प. कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान, राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या उपस्थितीत नुकतीच मंत्रालयात बैठक झाली.
कर्मचाऱ्यांच्या समस्या सुटणार
ठळक मुद्देमुख्य सचिवांची ग्वाही : जि. प. कर्मचाºयांच्या हितासाठी मुंबईत बैठक