शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावरून गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 23:42 IST

चंद्रपूर महानगरपालिकेने चंद्रपूर-नागपूर व चंद्रपूर-मूल मार्गावर इलेक्ट्रॉनिक वजन काटे लावले आहेत. मात्र या वजन काट्यावर नियमबाह्यरीत्या काम होत आहे.

ठळक मुद्देमनपाची आमसभा : कोट्यवधींचा महसूल बुडाल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेने चंद्रपूर-नागपूर व चंद्रपूर-मूल मार्गावर इलेक्ट्रॉनिक वजन काटे लावले आहेत. मात्र या वजन काट्यावर नियमबाह्यरीत्या काम होत आहे. या मुद्यावरून मनपाच्या आमसभेत चांगलाच गदारोळ झाला. अखेर याबाबत तात्काळ चौकशी करण्याचे आश्वासन महापौरांना द्यावे लागले.महानगरपालिकेचे आमसभा आज गुरुवारी दुपारी १ वाजता मनपाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर अंजली घोटेकर होत्या. यावेळी उपमहापौर अनिल फुलझेले, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, आयुक्त संजय काकडे, उपायुक्त विजय देवळीकर उपस्थित होते.सभेला सुरुवात होताच नगरसेवक पप्पु देशमुख यांनी मनपाच्या या इलेक्ट्रानिक वजनकाट्यांचा विषय सभागृहापुढे ठेवला. चंद्रपूर-नागपूर व चंद्रपूर-मूल मार्गावर मनपाने इलेक्ट्रानिक वजन काटे लावले आहेत. मनपा हद्दीत येणाºया जडवाहनावर कारवाई करणे, हा यामागील उद्देश. मात्र या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. या वजनकाट्यावर उपप्रादेशिक परिवहन विभागातील वाहतूक निरीक्षक यांच्या बसण्याची व्यवस्था असावी, असे शासनाच्या अध्यादेशात नमूद आहे. तशी व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. मात्र प्रत्यक्षात तिथे वाहतूक निरीक्षक नसतो. मागील दीड वर्षांपासून या वजन काट्यावर एकाही जडवाहनावर कारवाई झालेली नाही. सर्व ओव्हरलोड वाहनांना मनपा हद्दीत जाण्याची सरसकट परवानगी कशी काय देण्यात आली, असा प्रश्न नगरसेवक पप्पु देशमुख यांनी उपस्थित केला. सभागृहात उपस्थित आणखी अनेक नगरसेवकांनी देशमुख यांच्या मुद्याला पाठिंबा देत गदारोळ केला.यावर उत्तर देताना मनपा आयुक्त संजय काकडे यांनी सदर वजन काटे शासनाच्या आदेशानुसार लावले असून ओव्हरलोड वाहनांवर कारवाईची जबाबदारी परिवहन विभागाची असल्याचे सांगितले. परिवहन विभागाचा अधिकारी कारवाई करीत नसेल तर हे वजनकाटे तत्काळ बंद करा, अशी मागणी देशमुख यांनी केली. त्यानंतर महापौर अंजली घोटेकर यांनी याबाबतची तत्काळ चौकशी करण्याचे आश्वासन सभागृहाला दिले.असे झाले नुकसानया वजनकाट्यावर आतापर्यंत वजन मोजण्याच्या शुल्कापोटी तीन कोटी ६० लाख रुपयांच्यावर वसुली करण्यात आली आहे. प्रत्येक वाहनाचे सरासरी शुल्क ४० रुपये आहे. याचा अर्थ ११ ते १२ लाख वाहने मागील दीड वर्षात येथून गेली आहे, असे नगरसेवक पप्पु देशमुख यांनी सांगितले. यापैकी पाच टक्के वाहनातून ओव्हरलोड वाहतूक झाली, असे समजल्यास ६० हजारच्या वर ओव्हरलोड वाहने येथून गेली. यातून प्रत्येकी किमान पाच हजार रुपये दंड पकडल्यास २५ ते ३० कोटी रुपयांचा शासनाचा महसूल बुडाला आहे, असे देशमुख यांनी सभागृहासमोर स्पष्ट करून सांगितले.जादा कर रद्द करासध्या मनपा हद्दीतील मालमत्ता करात दोन टक्के जादा कर आकारला जात आहे. शासनाच्या आदेशामुळे असे करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आधीच वाढीव कर आकारला जात आहे. आता पुन्हा दोन टक्के जादा कर नागरिकांवर अधिकचा भुर्दंड टाकणारा आहे. त्यामुळे हा कर रद्द करावा, अशी मागणी नगरसेविका सुनिता लोढिया यांनी केली. दरम्यान, महानगरपालिकेची अग्निशमन वाहने आणि रुग्णवाहिकेची अवस्था फारशी चांगली नाही. या वाहनांच्या देखभालीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचे नगरसेवक दीपक जयस्वाल यांनी सभागृहात सांगितले.