शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

आठ महिन्यांत ८३ लाखांची वीज चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 23:59 IST

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातअंतर्गत चंद्रपूर विभागाने एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१७ दरम्यान तब्बल ८३ लाख ४१ हजार ३५६ रुपयांच्या वीजचोऱ्या महावितरणने उघडकीस आणल्या आहेत.

ठळक मुद्दे३१८ प्रकरणे : तब्बल ७ लाख १५ हजार वीज युनिट चोरले

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातअंतर्गत चंद्रपूर विभागाने एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१७ दरम्यान तब्बल ८३ लाख ४१ हजार ३५६ रुपयांच्या वीजचोऱ्या महावितरणने उघडकीस आणल्या आहेत. चंद्रपूर शहरी उपविभाग १ व २ मध्ये ही कारवाई करण्यात आली. एकंदरीत ३१८ वीजचोरीच्या प्रकरणांमध्ये ७ लाख १५ हजार ७४० वीज युनिटची वीजचोरी झाली. परंतु, महावितरणच्या अधिकारी व कर्मचाºयांनी वीजचोरीचा प्रयत्न हाणून पाडत वीजचोरी व दंडापोटी ९५ लाख रुपये वसुल केले आहे. वीजचोरांविरूध्द, वीजकायदा २००३ च्या कलम १३५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल व चंद्रपूर मंडलाचे अधीक्षक अभियंता हरीश गजबे यांच्या मार्गदर्शनात- चंद्रपूर विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश कुरेकार यांनी चंद्रपूर उपविभागाचे कार्यकारी अभियंता समीर टेकाडे व वसंत हेडाऊ तसेच भरारी पथकाचे उपकार्यकारी अभियंता शेखर दास यांनी शाखा अभिंयता अमोल पिंपळे, टिकेश राउत, सचिन कापसे आदींनी केली.यांनी केली वीज चोरीसुरेदं्रसिंग भाटीया - ३ लाख ५७ हजार, चरणदास गेडाम ३१ हजार ८९३ रुपये, अब्दुल सलीम अब्दुल कादीर- ८२ हजार ३०३, शाबिर हुसेन सयद - ३० हजार ६६०, आनंद विश्वास - २२ हजार ३६२, संजय सातुपते - १९ हजार ८१०, शहीद शेख अब्दुल हुसेन - २५ हजार ७८०, रंगया दासरवार - ४८ हजार २५०, मो. साफी - ५० हजार ४१०, अब्दुल जब्बार उस्मान - १९ हजार २५०, अब्दुल बारी अब्बास अली खाप - ६२ हजार ४९०, जाहिद अहमद खान - १ लाख २० हजार ४४० ,महादेव येरमे -२३ हजार ८४०, लता येरमे - ४७ हजार २००, शेख रशिद शेख रहेमतुल्ला - ९९ हजार ४५०, हरीभाऊ बोंगिरवार - ७८ हजार १४०, निमई दास - १ लाख ८३ हजार ३३०, गोपाल निमई दास - ३७ हजार ७१०, अब्दुल बशिर रज्जाक - ३७ हजार ३८०, अंजनाबाई कोठाळकर ४९ हजार ५००, निखिल डहाले - ४ लाख ३५ हजार ३२०, निखिल डहाले -२ लाख १९ हजार ७७०, अनिल पुंडलिक कोवे - ८० हजार ३००, आशिष विलासराव जोशी - ९१ हजार १२०, उल्हास पुगलिया - ३८ हजार ७० रुपये.वीज चोरीचे प्रकारवीज मीटरमध्ये रेजिस्टंस टाकणे, मीटर बायपास करणे, सर्किटमध्ये फेरफार, सर्व्हिस वायर टॅप करणे, मीटरमध्ये कॅपॅसिटर टाकणे, लिंक वायर कट करणे, एक्स रे फिल्म टाकून मीटर थांबविणे, लिंक वायर शॉट करणे, सीटी व पीटी बायपास करणे लुप टाकणे, सीटी व पीटी वायर कट व लांबी कमी करणे आदी वीज चोरीचे प्रकार उघडकीस आले आहेत.