शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कुणाला डॉक्टरांकडे जाता येईना, तर कुणी जगताहेत औषधाविना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2024 15:27 IST

सरकारने थांबविला निधी : भूमिहीन, निराधार व वृद्धांचे पैशाअभावी हाल

शशिकांत गणवीरलोकमत न्यूज नेटवर्कभेजगाव : मजूर, शेतमजूर, भूमिहीन, निराधार वृद्धांसाठी केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना आधार ठरत आली. ८० टक्के राज्य व २० टक्के केंद्र शासनाच्या वाट्यातून योजना चालते. मात्र, केंद्राने आपला वाटा न दिल्याने मूल तालुक्यासह जिल्हाभरातील हजारो लाभार्थ्यांचे एक वर्षांपासून पैशाविना हाल सुरू आहेत. निराधारांना उपचारासाठी डॉक्टरांकडे जाता येईना, कुणी गेलाच तर औषध विकत घेण्याची क्षमता उरली नाही.

केंद्राचा २० टक्के वाटा गेला कुठे?निराधार योजना विभागाकडून लाभार्थ्यांना खातात नियमित निवृत्तीवेतन जमा करण्याचे उद्देशाने नागरी आर्थिक व्यवस्थापन संगणक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे, या प्रणालीतील तांत्रिक अडचणीमुळे केंद्राचा २० टक्के वाटा मिळण्यास अडचणी येत आहेत अशा प्रकारे केंद्राच्या निधीपासून वंचित आहेत. 

पुन्हा किती दिवस पाहणार ?राज्य शासनाकडून श्रावण बाळ योजनेतील ८० टक्के निधी मूल तालुक्यातील वृद्धांना दिला जात आहे. राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेत हजारो वृद्धांचा समावेश आहे. या वृद्ध लाभार्थ्यांना जून २०२३ पासून राज्य शासनाच्या वाट्यातील ८० टक्के वाटा म्हणजे प्रतिमाह १२०० रुपये मिळत आहेत. मात्र, केंद्राचा २० टक्के वाटा म्हणजे प्रतिमाह ३०० रुपये वर्षभरापासून मिळालेला नाही. त्यामुळे दारिद्ररेषेखालील गरीब निराधार वृद्धांचे पैशाविना हाल सुरू आहेत.

 

"एक वर्षापासून केंद्राकडून मिळणारा थकीत निधी लाभार्थ्यांना देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. निधीची मागणी झाली असून प्राप्त होताच लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यात येईल."- ओमकार ठाकरे, नायब तहसीलदार, मूल लाभार्थी 

 

टॅग्स :government schemeसरकारी योजनाchandrapur-acचंद्रपूर