सावली : पाथरी येथे लग्नकार्य आटोपून परत जात असताना झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार तर चार जण जखमी झाल्याची घटना सावलीजवळील खेडी येथे शुक्रवारी घडली.अपघातात ज्योत्स्ना राहुल नगराळे (४२) रा. आवाळपूर व रिया गोपीचंद खैरकर रा. वर्धा या आठ वर्षीय बालिकेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर वाहन चालक गेडाम (५५) रा. चंद्रपूर, हेमा आशीष गडपायले (३५) रा. नागपूर हे गंभीर जखमी झाले. गुड्डी राहुल नगराळे (१६) रा. आवाळपूर, सम्राट गोपीचंद खैरकर (६) रा. वर्धा यांना किरकोळ दुखापत झाली आहे. पोंभुर्णा येथील जनार्धन खोब्रागडे यांच्या मुलाचा विवाह सावली तालुक्यातील पाथरी येथे पार पडला. विवाह आटोपून रात्री १२ वाजताच्या दरम्यान गावाकडे परत जात असताना खेडी गावाजवळ चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला एमएच ३४ के २६२३ या कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, त्यातील दोन जण जागीच ठार झाले. वाहनात असणारे सर्व सदस्य पोंभुर्णा येथील रिपाइंचे ज्येष्ठ नेते लुलाराम खोब्रागडे यांचे नातेवाईक आहेत. (तालुका प्रतिनिधी)
अपघातात आठ वर्षीय बालिकेसह महिला ठार
By admin | Updated: May 16, 2015 01:36 IST