शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
4
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
5
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
6
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
7
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
8
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
9
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
10
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
11
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
12
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
13
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

अनियमित बसफेरीमुळे शिक्षणाचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 11:02 PM

राज्य परिवहन महामंडळाच्या मूल डेपोतून गोंडपिपरीमार्गे सकाळच्या सुमारास सोडली जाणारी बस नियोजित वेळेवर सोडली जात नसल्याने नांदगाव, गोवर्धनपासून गोंडपिपरीला शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थिनींची मोठी अडचण होत आहे. नियोजित वेळेपेक्षा बऱ्याच उशिराने बस येत असल्याने विद्यार्थिनींच्या अनेक तासिका बुडत असून मूल डेपो व्यवस्थापनाच्या अनागोंदी कारभाराचा त्यांना फटका बसत आहे. त्यामुळे पालकवर्गांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देडेपो व्यवस्थापनाचा अनागोंदी कारभार : मानव विकास योजनेपासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या मूल डेपोतून गोंडपिपरीमार्गे सकाळच्या सुमारास सोडली जाणारी बस नियोजित वेळेवर सोडली जात नसल्याने नांदगाव, गोवर्धनपासून गोंडपिपरीला शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थिनींची मोठी अडचण होत आहे. नियोजित वेळेपेक्षा बऱ्याच उशिराने बस येत असल्याने विद्यार्थिनींच्या अनेक तासिका बुडत असून मूल डेपो व्यवस्थापनाच्या अनागोंदी कारभाराचा त्यांना फटका बसत आहे. त्यामुळे पालकवर्गांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.मूल तालुक्याअंतर्गत येणाऱ्या नांदगाव, गोवर्धन आणि गोंडपिपरी तालुक्यातील घोसरीपासून दिघोरी, कवठी, घाटकूळ, भिमणी, नवेगाव मोरे आदी गावातील अनेक मुले-मुली गोंडपिपरी येथील स्व. लक्ष्मणराव जगन्नाथजी कुंदोजवार कनिष्ठ महाविद्यालय व इतर महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांना कॉलेजमध्ये जाण्यासाठी सकाळची बसफेरी मूल डेपोतून गोंडपिपरीसाठी सोडली जाते. पूर्वी ही बस नियोजित वेळी मूलवरून सोडली जायची. त्यामुळे विद्यार्थ्यांना घेऊन ती ७ ते ७.२० वाजेपर्यंत गोंडपिपरीला पोहोचायची. त्यामुळे या सर्व गावाहून गोंडपिपरीला शिक्षणासाठी जाणाºया मुलींना सोईचे व्हायचे. सर्व तासिका त्यांना मिळायच्या. परंतु, चालू शैक्षणिक सत्रात ही बसफेरी नियोजित वेळेवर सोडली जात नसल्याने गोंडपिपरीला पोहोचायला विद्यार्थ्यांना कधी ८ वाजता तर कधी खूप उशीर होत आहे. परिणामी विद्यार्थिनींना महाविद्यालयात वेळेवर पोहोचता येत नसून रोजच तासिका बुडत असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत महाविद्यालय प्रशासनाकडून मूल डेपो व्यवस्थापनाला निवेदन देऊन सदर बस सकाळी लवकर सोडण्याची मागणी करण्यात आली. परंतु, डेपो व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यार्थिनींची ही अडचण पाहता डेपो व्यवस्थापनाने सकाळची बसफेरी किमान ७.२० वाजतापर्यंत गोंडपिपरीला पोहोचेल, या बेताने मूलवरून सोडावी, अशी मागणी विद्यार्थिनी व पालकांनी केली आहे.विद्यार्थिनींना सुविधांचा लाभ द्यावासावित्रीच्या लेकींना शिक्षणात अडथळा येऊ नये, यासाठी शासनाने मानव विकास मिशनअंतर्गत इयत्ता १२ वीपर्यंत मुलींना शिक्षणाच्या ठिकाणी ये-जा करण्याकरिता मोफत बससेवेचा लाभ सुरू केला आहे. परंतु, मूल-गोंडपिपरी मार्गावर धावणाºया बसफेऱ्यांमधून या सेवेचा लाभ विद्यार्थिनींना दिला जात नसल्याच्याही अनेक तक्रारी येत आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींना शिक्षण घेणे अवघड होत असून वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन शासनाच्या धोरणानुसार इयत्ता १२ वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थिनींना या सुविधेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी होत आहे.