चिमूर : कोरोना काळात जसे मेडीकल, डॉक्टर महत्वाचे होते तसेच या काळात अर्थशास्त्र विषयाची भुमिका महत्वाची आहे. अर्थशास्त्र हा विषय प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत आहे. अर्थशास्त्र व स्पर्धा परीक्षा यांच्यातील सबंध अगदी जवळचा असल्याचे असे माजी प्रभारी कुलगुरू, व वाणिज्य आणि व्यवस्थापन परिषदेचे अधिष्ठाता डाॅ. विनायक देशपांडे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात आयोजित अर्थशास्त्र विषयाचे अर्थशास्त्र अभ्यास मंडळ आणि ऑनलाईन अर्थशास्त्र मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य कार्तिक पाटील होेते. त्यांनी आधुनिक काळातील अर्थशास्त्र व स्पर्धा परीक्षेचे महत्व व व्याप्ती स्पष्ट केली. ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्गासाठी अर्थशास्त्र विषय किती महत्वाचा आहे. हे समजावून सांगितले. प्रास्ताविकेत अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेश्वर रहांगडले यांनी केले. संचालन प्रा. राकेश कुमरे, आभार प्रा. वाघमारे यांनी मानले.कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.