शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

७०० लघु उद्योगांचे अर्थचक्र अद्याप रूतलेलेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 07:00 IST

small scale industries Chandrapur News सुक्ष्म, लघु व बिगर कृषी क्षेत्रातील सुमारे ७०० लघु उद्योग अद्याप सावरलेच नाहीत. पुरेसा रोजगारच मिळत नसल्याने कामगारांनाही उद्याची चिंता सतावू लागली आहे.

ठळक मुद्दे रोजगार हिसकाल्याने असंघटीत कामगार चिंतातूर

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका असंघटीत क्षेत्रातील हजारो कामगारांना बसला होता. रूळावरून घसरलेले अर्थचक्र लवकरच मार्गी लागेल अशी आशा होती. मात्र, दिवाळी तोंडावर असतानाही मंदावलेल्या मागणीमुळे  सुक्ष्म, लघु व बिगर कृषी क्षेत्रातील सुमारे ७०० लघु उद्योग अद्याप सावरलेच नाहीत. पुरेसा रोजगारच मिळत नसल्याने कामगारांनाही उद्याची चिंता सतावू लागली आहे.

देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर लॉकडाऊन झाले. या लॉकडाऊनमुळे अपरिमित हानी झालेली अर्थव्यवस्था आणि बुडालेली उदरनिवार्हाची साधने पुन्हा पूर्वपदावर येण्यास किमान सहा महिने लागतील, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला होता. जिल्ह्यात २ मे २०२० रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला. त्यानंतर रूग्णांची संख्या झपाट्याने वाढली. कोरोनाची साखळी तोडण्याचे आजही शथीर्चे प्रयत्न सुरू आहेत. याचे सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या चार महिन्यांच्या कालावधीत जीवनावश्यक वस्तुंसह बरेच व्यवसाय सुरू झाले. मात्र, प्रामुख्याने रोजगार पुरविणाऱ्या सुक्ष्म, लघू, मध्यम उद्योग व कृषिपुरक तसेच बिगरकृषी सहकारी संस्थांची स्थिती अजुनही पालटली नाही. कोरोना लॉकडाऊन उठविल्यानंतर बदलेली कामगारांची संख्या, स्वबळावर उद्योग चालविणारे व्यक्ती, कृषी व बिगर संस्थांमध्ये कामगारांची माहिती संकलनाचे काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आले. हा डेटा सुद्धा चिंतेत भरणारी असल्याची माहिती प्रशासकीय वतुर्ळातील सूत्राने लोकमत ला दिली.सुरू झालेले उद्योगही संकटातलॉकडाऊन आधी जिल्ह्यात सुक्ष्म, लघु, मध्यम व मोठ्या गटातील ३ हजार २०० उद्योग सुरू होते. त्यामध्ये ५६ हजार १२१ कामगारांना रोजगार मिळत होता. लॉकडाऊन हटविल्यानंतर २ हजार ५३० उद्योग सुरू झाले. यामध्ये ४५ हजार ४१२ कामगारांना रोजगार मिळाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला होता. परंतु, कच्च्या मालाची आवक व उत्पादीत मालाची मागणी यातील अंतर दूर झाले नाही. त्यामुळे कामगारांना तात्पुरत्या स्वरूपात कमी करणे सुरू झाले आहे.म्हणे फक्त १४ हजार बेरोजगार!जिल्ह्यातील राईसमील, चंद्रपूर औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्रातील रासायनिक, स्पंज आर्यन, सिमेंट, वाहने व विविधउद्योगांना लागणारे सुटे भाग, तेल गिरण्या,कृषी क्षेत्रातील निगडीत अवजारे व औष्णिक कें द्रासाठी आवश्यक तांत्रिक साधनांचे उत्पादन सुरू आहे. मात्र, मागणीअभावी या उद्योगांनीही कामगार कमी केले. उद्योग विभागाच्या माहितीनुसार १४ हजार व्यक्ती बेरोजगार झाल्याची नोंद आहे. परंतु, प्रत्यक्षात ही संख्या धक्कादायक असण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :businessव्यवसाय