शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर महानगराला वाहतूक कोंडीचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:26 IST

शहराची ऐतिहासिक शहर म्हणून ओळख आहे. शहरातील ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जटपूरा गेट, चोर खिडकी, अंचलेश्वर गेट येथील मार्ग अरुंद असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. यासह शहरातील विविध ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ठळक मुद्देवाहनचालकांना त्रास : मनपाकडे उपाययोजनेचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहराची ऐतिहासिक शहर म्हणून ओळख आहे. शहरातील ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जटपूरा गेट, चोर खिडकी, अंचलेश्वर गेट येथील मार्ग अरुंद असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. यासह शहरातील विविध ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.चंद्रपूर शहराची लोकसंख्या साडेचार लाखांच्या घरात आहे. चंद्रपूर शहर मोठे असले तरी येथील मुख्य बाजारपेठ महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी मार्गालगतच असल्याने हा मार्ग शहरातील मुख्य मार्ग समजला जातो. त्यामुळे याठिकाणी मोठी वर्दळ असते. त्याचप्रमाणे या मार्गावर असलेल्या ऐतिहासिक जटपूरा गेटमुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे नागरिकांना बराचवेळ ताटकळत राहावे लागते. सदर समस्या सोडविण्यासाठी राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी आंदोलने केली. मात्र पुरातत्व विभागाने याची दखल घेतली नाही. याचबरोबर शहरातील चोर खिडकी येथील मार्गसुद्धा अरुंद असल्याने मोठी प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते. मात्र याठिकाणी वाहतूक विभागाने शिपायाची नेमणूक केली नाही. त्यामुळे याठिकाणी बºयाचदा वाहने काढताना वाहनचालकांचे वाद होतात. अनेकदा मारामारीच्या घटनासुद्धा घडल्या आहेत. त्याचप्रमाणे शहरातील सपना टॉकीज चौक, गांधी चौक, अंचलेश्वर गेट, गिरणार चौक, छोटा बाजार चौक, बसस्थान चौक याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.बाबूपेठ येथे उड्डाणपुलाची गरजबाबूपेठ येथून रेल्वे लाईन गेली असल्यामुळे रेल्वे जाताना बराच वेळ नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे याठिकाणी उड्डाणपुलाची निर्मिती करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली. त्याची दखल घेत संबंधित विभागाने याठिकाणी तीन ते चारदा उड्डाणपूल बांधकामाचे भूमिपूजन केले. मात्र अजूनही प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही. परिणामी नागरिकांना बराच वेळ याठिकाणी ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे उड्डाणपूलाचे काम त्वरीत सुरु करावे, अशी मागणी येथील नागरिकांकडून होत आहे.वाढते अतिक्रमण हटवावेशहरातील म. गांधी चौक व कस्तुरबा मार्ग मुख्य मार्ग म्हणून ओळखले जातात. या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी राहत असते. हे मार्ग पूर्वीच अरुंद आहेत. त्यातही दिवसेंदिवस अतिक्रमणामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे हे मार्ग पुन्हा अरुंद झाल्याने या मार्गावरुन वाहन काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. तरीसुद्धा मनपाला अतिक्रमण हटाव मोहीमेचा विसर पडला आहे.बेलगाम पार्किंगच कारणीभूतशहरामध्ये अनेक चौकात पार्किंगचे स्पॉट निर्माण करण्यात आले नाही. त्यामुळे वाहनचालक रस्त्यावरच वाहने ठेवत असतात. परिणामी रहदारीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मनपा प्रशासनाने चौका-चौकात पार्किंग स्पाट तयार करावे, अशी मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.वाहतूक शिपायाची नियुक्ती करावीशहरातील चोर खिडकी, गंजवॉर्ड, गोल बाजार, याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामुळे अनेकदा वाहन काढताना वाहनचालकांचे आपसात वाद झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी वाहतूक शिपायाची नियुक्ती करावी, तसेच लोकमान्य टिळक विद्यालय व हिंदी सिटी हायस्कूल येथे शाळा भरण्याच्या व शाळा सुटण्याच्या वेळेस मोठ्या प्रमाणात वर्दळ राहत असते. परिणामी अपघाताची शक्यता निर्माण झाली असून याठिकाणी वाहतूक शिपायाची नियुक्ती करणे गरजेचे आहे.वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करीत असून जटपूरा गेट येथे दोन वाहतूक शिपायांची तसेच प्रियदर्शिनी चौकानजीक पाण्याच्या टाकीजवळ एका पोलीस शिपायाची नेमणूक केली आहे. तसेच दवाबाजार शेजारील वनवे सुरु करण्यात आला आहे.- विलास चव्हाण, वाहतूक निरीक्षक, चंद्रपूर