शहरं
Join us  
Trending Stories
1
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
2
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
3
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
4
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
5
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
6
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
7
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
8
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
9
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
10
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
11
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
12
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
13
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
14
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
15
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
16
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
17
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
18
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
19
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
20
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री

कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी भ्रष्टाचाऱ्यांच्या रडारवर !

By admin | Updated: June 21, 2015 01:35 IST

जिल्ह्यात दारुबंदीची अंमलबजावणी होताच काही भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांनी डोके बाहेर काढायला सुरुवात केली आहे.

रुपेश कोकावार बाबुपेठ (चंद्रपूर)जिल्ह्यात दारुबंदीची अंमलबजावणी होताच काही भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्यांनी डोके बाहेर काढायला सुरुवात केली आहे. यामुळे दारुतस्करांना अभय मिळत असून कर्तव्यदक्ष पोलिसांचे खच्चीकरण होत आहे. मात्र या भ्रष्टांना कर्तव्यदक्ष पोलिसांकडून धोका वाटू लागल्याने त्यांनी अशा इमानदार पोलिसांचाच बंदोबस्त करायला सुरुवात केली आहे. यातूनच इमानदार पोलिसांच्या खोट्या तक्रारी वरिष्ठांपर्यंत पोहचवून त्यांना रडारवर ठेवण्याचे काम सुरू झाले आहे.सध्या अवैध दारुविरोधी कारवाया सुरू आहे. यामध्ये आजवर लाखोंचा दारुसाठा पोलिसांनी जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनीही या अवैद्य दारुविक्रीवर प्रत्यक्ष लक्ष घालणे सुरू केले आहे. एकीकडे दारु विक्रेत्यांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कर्तव्यदक्ष पोलीस रात्रंदिवस राबतोय. आपल्या बिटमध्ये दारु विकली जाऊ नये, यासाठी २४ तास तो धडपडत असतो. तर दुसरीकडे त्याच खात्यातील काही भ्रष्ट पोलीस कमी वेळात लाखोंची माया जमवण्यासाठी आपल्या खात्याशीच गद्दारी करुन दारु विक्रेत्यांशीच सूत जुळवित आहेत.काही प्रकरणांमध्ये तर या भ्रष्ट पोलिसांनी दारु विक्रेत्यांचा माल संबधित ठिकाणी पोहचवून देण्याची जबाबदारीच आपल्या खांद्यावर घेतल्याची माहिती आहे. प्रत्येक हद्दीत असा प्रकार सुरू असून काही भ्रष्ट पोलीस कर्मचारीच या साखळीत गुंतलेल्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने आपल्या हद्दीतून माल बाहेर काढून देत आहेत. हा प्रकार मागील काही दिवसापासून सुरु झाला असून यातून अनेकांनी लाखोंची माया गोळा केली आहे. हा प्र्रकार येथेच न थांबता अनेक पोलिसांनाही या चक्रव्यहात अडकविण्याचा या भ्रष्ट साखळीचा कट असल्याची धक्कादायक माहिती आहे. विशेष म्हणजे, जे पोलीस कर्मचारी अशा आमिषाला बळी न पडता दारुविक्रीविरुद्ध आपली मोहीम राबवित आहेत, अशा कर्तव्यतत्पर पोलिसांचेच दारुविक्रेत्याशी अर्थपूर्ण संबंध असल्याचे चित्र निर्माण करून वरिष्ठांमध्ये संभ्रम पसरविण्याचा प्रकारही अवलंबिला जात आहे. यातून कर्तव्यदक्ष पोलिसांचा बळी घेण्याचा प्रयत्न होत आहे. खात्यातील अधिकारीही  गुंतल्याची शक्यता सध्यातरी या प्रकारात मोठे अधिकारी गुंतले असल्याची चर्चा नसली तरी एखाद्या अधिकाऱ्यांशिवाय हे शक्य आहे का, असा प्रश्न आपसुकच उपस्थित होतो. चंद्रपुरात दारूसाठा आणल्यानतंर तो इप्सित स्थळी पोहचविण्याची जबाबदारी संबधित व्यापाऱ्याची असली तरी. आता ही जबाबदारी भ्रष्ट पोलीसच पार पाडत आहेत. त्यांनी घेतलेल्या या मोठ्या जोखीमीला कुण्या एखाद्या अधिकाऱ्याचे पाठबळ असण्याची शक्यता अधिक आहे. मूलमधील प्रकार यातून घडल्याची चर्चाकाही दिवसांपूर्वी मूल पोलिसांनी एका दारु विक्रत्याला देशी दारुच्या ५० पेट्यासह अटक केली होती. हा दारुसाठा चंद्रपूर येथे पोहचविला जाणार होता. मात्र एका अधीकाऱ्याच्या सतर्कतेने माल मुल येथे पकडण्यात आला. या अधिकाऱ्याच्या वाढत्या कारवाया भ्रष्ट पोलिसांना धोकादायक वाटू लागल्या. त्याचा वचपा काढण्यासाठी संबधित दारुविक्रेत्यांवर दबाव आणून त्याच्याकडून कारवाई टाळण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला पैसे दिल्याचे वदवून घेतले. हे जाणीवपूर्वक केलेले संभाषण रेकार्ड करुन पोलीस अधीक्षकांकडे सादर करण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, ज्या पोलीस अधिकाऱ्याविरूध्द हा कट रचला गेला, त्या अधिकाऱ्याने मूलमध्ये दारुविरोधी सर्वाधिक कारवाया केल्या होत्या. या प्रकरणी संबधित दारु विक्रत्याचे बयाण ब्रम्हपुरी येथील उपविभागीय पोलीस अधीकाऱ्यांसमोर घेण्यात आले. त्यावेळी संबधित दारु विक्रेत्याने आपल्यावर दबाव टाकून चुकीचे बोलायला लावल्याचे बयाणात नमूद केल्याची माहिती आहे. मूलमधील प्रकार यातून घडल्याची चर्चाकाही दिवसांपूर्वी मूल पोलिसांनी एका दारु विक्रत्याला देशी दारुच्या ५० पेट्यासह अटक केली होती. हा दारुसाठा चंद्रपूर येथे पोहचविला जाणार होता. मात्र एका अधीकाऱ्याच्या सतर्कतेने माल मुल येथे पकडण्यात आला. या अधिकाऱ्याच्या वाढत्या कारवाया भ्रष्ट पोलिसांना धोकादायक वाटू लागल्या. त्याचा वचपा काढण्यासाठी संबधित दारुविक्रेत्यांवर दबाव आणून त्याच्याकडून कारवाई टाळण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला पैसे दिल्याचे वदवून घेतले. हे जाणीवपूर्वक केलेले संभाषण रेकार्ड करुन पोलीस अधीक्षकांकडे सादर करण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, ज्या पोलीस अधिकाऱ्याविरूध्द हा कट रचला गेला, त्या अधिकाऱ्याने मूलमध्ये दारुविरोधी सर्वाधिक कारवाया केल्या होत्या. या प्रकरणी संबधित दारु विक्रत्याचे बयाण ब्रम्हपुरी येथील उपविभागीय पोलीस अधीकाऱ्यांसमोर घेण्यात आले. त्यावेळी संबधित दारु विक्रेत्याने आपल्यावर दबाव टाकून चुकीचे बोलायला लावल्याचे बयाणात नमूद केल्याची माहिती आहे. मूलमधील प्रकार यातून घडल्याची चर्चाकाही दिवसांपूर्वी मूल पोलिसांनी एका दारु विक्रत्याला देशी दारुच्या ५० पेट्यासह अटक केली होती. हा दारुसाठा चंद्रपूर येथे पोहचविला जाणार होता. मात्र एका अधीकाऱ्याच्या सतर्कतेने माल मुल येथे पकडण्यात आला. या अधिकाऱ्याच्या वाढत्या कारवाया भ्रष्ट पोलिसांना धोकादायक वाटू लागल्या. त्याचा वचपा काढण्यासाठी संबधित दारुविक्रेत्यांवर दबाव आणून त्याच्याकडून कारवाई टाळण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला पैसे दिल्याचे वदवून घेतले. हे जाणीवपूर्वक केलेले संभाषण रेकार्ड करुन पोलीस अधीक्षकांकडे सादर करण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, ज्या पोलीस अधिकाऱ्याविरूध्द हा कट रचला गेला, त्या अधिकाऱ्याने मूलमध्ये दारुविरोधी सर्वाधिक कारवाया केल्या होत्या. या प्रकरणी संबधित दारु विक्रत्याचे बयाण ब्रम्हपुरी येथील उपविभागीय पोलीस अधीकाऱ्यांसमोर घेण्यात आले. त्यावेळी संबधित दारु विक्रेत्याने आपल्यावर दबाव टाकून चुकीचे बोलायला लावल्याचे बयाणात नमूद केल्याची माहिती आहे.