शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

दुर्गा, शारदा मंडळांना मिळणार वीजदरात सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 22:12 IST

सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या दुर्गा व शारदा उत्सव मंडळांना सवलतीने वीज जोडणी करण्याचा निर्णय वीज वितरण कंपनीने घेतला. वहन आकारासह रुपये ३८ पैसे प्रति युनिट माफक वीज दराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी करण्यासाठी संबंधित मंडळांनी अर्ज सादर करण्याचे कंपनीकडून कळविण्यात आले आहे.

ठळक मुद्देवीज कंपनीचा निर्णय : चार रूपये ३८पैसे प्रति युनिट जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा करणाऱ्या दुर्गा व शारदा उत्सव मंडळांना सवलतीने वीज जोडणी करण्याचा निर्णय वीज वितरण कंपनीने घेतला. वहन आकारासह रुपये ३८ पैसे प्रति युनिट माफक वीज दराने तात्पुरती व अधिकृत वीजजोडणी करण्यासाठी संबंधित मंडळांनी अर्ज सादर करण्याचे कंपनीकडून कळविण्यात आले आहे.सार्वजनिक नवरात्रोत्सवादरम्यान रोषणाई व देखांव्यासाठी लागणारी वीजयंत्रणा ही अधिकृत कंत्राटदारांकडूनच करणे बंधनकारक आहे. शिवाय, अर्थिंगचीही खबरदारी घेणे गरजेचे आहे. वायरिंगसाठी वापरण्यात येणारे सर्व वायर्स हे वीजभारासाठी सक्षम नसल्यास शार्टसर्किटचा धोका निर्माण होऊ शकतो. जिल्ह्यातील मंडळांना २० पैसे अधिक एक रुपया, १८ पैसे वहन (व्हिलींग) आकार असे चार रुपये ३८ पैसे प्रती युनिट वीजदर लागू करण्यात आले आहे. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृत वीजपुरवठा घ्यावा आणि त्यानुसार सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व मिळावे, याकरिता तात्पुरत्या वीजजोडणीचा वीजदर कमी ठेवण्यात आला आहे. कंपनीचे नुकसान होऊ नये. वीज चोरी करून सरकारी कर बुडविणे चुकीचे आहे. अशा घटना घडू नये, याकरिता उत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमूळे जनरेटरमधील वीज लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते.विजेचा लघुदाब, उच्चदाब वाहिन्या आणि रोहित्रांचा मिरवणुकीतील देखाव्यांना स्पर्श होणार नाही, अशा सुरक्षित अंतरावर देखावे तयार करावे, असेही वीज अभियंत्यांनी सांगितले. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक नवरात्रोत्सवमंडळांनी वीज सुरक्षेबाबत उपाययोजनांमध्ये तडजोड करू नये. संबंधित मंडळांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात कागदपत्र सादर करून अधिकृत वीज पुरवठा घेऊनच उत्सव साजरा करण्याचे कंपनीने कळविले आहे.अधिकृत वीज जोडणीलाच प्राधान्य द्यासार्वजनिक मंडळांना तात्पुरत्या वीज जोडणी बिलींग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वीज मीटरसाठी घेतलेल्या रकमेतील उर्वरित रक्कम त्वरीत परत केले जाते. वीज जोडणी करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. आवश्यक कागदपत्र सादर केल्यास तातडीने वीज जोडणी करून दिली जाते. त्यामुळे हजारो भाविकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी अनाधिकृत वीज जोडणी करावी. पण, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करू नये, अशी माहिती महावितरण कंपनीने दिली. नवरात्रोत्सवदरम्यान मंडळांना तातडीने मदत मिळावी, याकरिता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी. शिवाय, संबंधित क्षेत्रातील महावितरण अभियंत्यांचे मोबाईल क्रमांक नोंदवून ठेवावे, असेही महावितरणकडून सांगण्यात आले.