शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
2
नेपाळमध्ये सोशल मीडिया Appsवर बंदी; Gen-Z आक्रमक, सरकारविरोधात तीव्र निदर्शने
3
अफगाणिस्तानात भूकंप आला त्यात फक्त पुरुषांना वाचवलं, महिलांना नाही; कारण ऐकून धक्का बसेल
4
शाब्बास हरभजन सिंग!! पूरग्रस्तांसाठी दिल्या ११ बोटी, ३ रूग्णवाहिका; ५० लाखांचा निधीही जमवला
5
सोशल मीडिया स्टारला करायचंय लग्न, सुयोग्य 'वर' शोधून देणाऱ्यास मिळणार ८८ लाख! पण...
6
बायको असावी तर अशी! 'सावित्री' घेतेय सत्यवानाची मुलासारखी काळजी; डोळे पाणावणारा Video
7
सणासुदीपूर्वी स्वस्त झालं सोनं, एकाच दिवसात मोठी घसरण; चांदीचे दरही घसरले, जाणून घ्या
8
साखरपुडा झाल्यानंतर प्राजक्ता गायकवाड तिरुपती बालाजीच्या दर्शनाला, म्हणाली "खूप वर्षांपासून"
9
Pitru Paksha 2025: पितृपक्षात आमसुलाच्या चटणीशिवाय नैवेद्याला पूर्णत्त्व नाही; वाचा महत्त्व आणि रेसिपी
10
"आता या लग्नाच्या हॉलमध्ये आग लागो, काहीही होवो पण....", लग्नाच्या दिवशी उमेश प्रियाला असं का म्हणाला?
11
Sangli Murder: तिसंगी येथे युवकाचा दगडाने ठेचून खून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू
12
निवृत्तीनंतरच्या नियोजनासाठी कुठे, कशी, कधीपासून गुंतवणूक करावी?
13
महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली...
14
Maratha Reservation : सरकारच्या GR विरोधातच मंत्री छगन भुजबळ कोर्टात जाणार; मराठा आरक्षणावरून OBC नेते आक्रमक
15
उद्या उपराष्ट्रपती पदाची निवडणूक; संख्याबळ कोणाकडे? कोणाचा कोणाला पाठिंबा? जाणून घ्या...
16
अंगणवाडी सेविका, मदतनीसांच्या मानधनात वाढ; निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांची मोठी घोषणा
17
World Record Broken! ४०० पारच्या लढाईत इंग्लंडनं साधला टीम इंडियाचा विश्व विक्रम मोडण्याचा डाव
18
अवघ्या १५० रुपयांत मिळतं लोकेशन, तर ६०० रुपयांत फोन रेकॉर्ड! पाकिस्तानी मंत्र्यांची सुरक्षा धोक्यात 
19
१५ वर्षीय मुलगी पाकिस्तानी मुलाच्या प्रेमात, भेटायला निघाली पण...; चॅटमधून खळबळजनक खुलासा
20
प्रयत्नांती परमेश्वर! लेक नापास पण आई झाली पास; वयाच्या पन्नाशीत लॉ कॉलेज प्रवेश परीक्षा क्रॅक

अकाली पावसामुळे झाडावरचा कापूस जमिनीवर

By admin | Updated: March 7, 2016 00:39 IST

सापडणाऱ्या शेतकऱ्यांवर यावेळी अकाली पावसाने आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची नामुष्की आणली आहे.

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा : मजुरी वाढल्याने ठेवला होता कापूसआशिष देरकर गडचांदूरसापडणाऱ्या शेतकऱ्यांवर यावेळी अकाली पावसाने आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची नामुष्की आणली आहे. अकाली पावसामुळे शेकडो हेक्टरमधील कापूस पीक जमिनीवर आल्याने शेतकऱ्यांचा जीव रडकुंडी आला आहे. या संकटाची झळ कापसासह अनेक पिकांना बसली आहे.कोरपना तालुक्यात आधीच दुष्काळसदृश परिस्थिती होती. मात्र शासनाने जाहीर केलेल्या आणेवारीत तालुका बसत नसल्याने सर्वच शेतकऱ्यांना आर्थिक मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. अशातच कापसाचा शेवटचा वेचा शिल्लक होता. त्यातून कसेबसे सावरले असते. मात्र निसर्गाला ते मान्य नव्हते. शेतकऱ्यांच्या शेवटच्या कापसावर अकाली पावसाने दरोडा टाकला. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी झाली आहे.अनेक शेतकऱ्यांचा शेवटचा वेचा शिल्लक होता. मजुरांच्या कमतरतेमुळे व मजुरी परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना कापूस वेचण्यात अडचणी येत होत्या. सध्या शेती हंगाम संपत आल्याने काही गरीब कास्तकारांनी मजुरी न देता हळूहळू घरच्याच लोकांच्या माध्यमातून कापूस वेचणी सुरु केली होती. जेनेकरुन बाहेरील मजुरांना मजुरी द्यावी लागणार नाही. पण अकाली पावसामुळे शेतकऱ्यांची ही शक्कल अपयशी ठरली. शेकडो हेक्टरमधील शेती पांढऱ्या सोन्याने फुललेली होती. मात्र अकाली पावसाने जमीन पांढरी झाली आहे.कोरपना तालुक्यातील कोरपनासह गडचांदूर, नांदा, बिबी,आवारपूर, वनसडी, उपरवाही, लखमापूर, बाखर्डी, निमणी, पालगाव, हिरापूर, सांगोडा, लोणी, पिपरी, गाडेगाव, विरुर राजुरगुडा, नैतामगुडा, पिंपळगाव,, धामणगाव, खिर्डी, वडगाव, इंजापूर, नोकारी, थुट्रा, कवठाळा, आसन, कढोली, अंतरगाव, बोरी, नवेगाव, पिपर्डा, परसोडा, कोडशी, कोडशी (बु.), नांदगाव, जैतापूर, धोपटाळा, रामपूर, कुकुडसात यांसह अनेक गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहेत.यावर्षी कापसाला चार हजार रुपयापर्यंत भाव देण्यात आला. मात्र मिळकतीपेक्षा खर्च जास्त अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. एकतर कापसाला भाव कमी आणि वेचणीची मजुरी महाग व अकाली पावसाची हजेरी अशा तिहेरी संकटात बळीराजा सापडला आहे. शासनाकडून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सरसकट मदतीची अपेक्षा शेतकरी करीत आहे.शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार द्या : सुभाष धोटेअकाली पावसामुळे फक्त कोरपना तालुक्यातीलच नाही तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहेत. शासनाने तातडीने सर्वेक्षण करुन चंद्रपूर जिल्ह्यातील नुकसानगस्त शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजार रुपयांची मदत करावी व चंद्रपूर जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी केली आहे.