लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गेल्या दोन दिवसांपासून चंद्रपूर शहर तसेच जिल्ह्यात रिपरिप पाऊस सुरू आहे. या पावसाने उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला असली तरी चंद्रपुरातील अंतर्गत तसेच मुख्य रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. अनेक रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यात पाणी साचल्याने चिखलाचा सामना करावा लागत आहे.चंद्रपूर महानगर पालिकेकडून शहरातील अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट क्रॉंक्रीटीकरण केले जात आहे. मात्र कमिशनच्या नादात अनेक रस्ते निकृष्ठ दर्जाचे तयार झालेत. परिणामी अल्पवधीतच अनेक रस्ते उखळून खड्डे पडले आहेत. त्यातच रिपरिप पाऊस सुरू असल्याने रस्ता आणखी उखळत आहे. तुकूम, बंगाली कॅम्प, बाबुपेठ, जटपुरा प्रभागातील रस्ते पूर्णत: चिखलमय झाले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करीत वाहन चालवावे लागते.तर हीच स्थिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली येत असलेल्या रस्त्यांची आहे. उन्हाळ्याच्या दिवसात बसस्थानक पसिरातील रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात आले; मात्र रामनगर चौक ते वाहतूक शाखेपर्यंत रस्ता उखळलेला असतानाही येथील साधे खड्डेही बुजविण्यात आले नाही. तर रामनगर चौकातून बंगाली कॅम्प रस्त्याचीही अशीच अवस्था आहे. रामनगर चौकात वळण असल्याने येथे रस्ता पूर्णत: उखळला आहे. त्यामुळे वाहनधारक घसरून पडण्याची अधिक शक्यता असते. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष देण्याची मागणी होत आहे.
पावसाने महानगरातील रस्त्यांची वाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:30 IST
गेल्या दोन दिवसांपासून चंद्रपूर शहर तसेच जिल्ह्यात रिपरिप पाऊस सुरू आहे. या पावसाने उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला असली तरी चंद्रपुरातील अंतर्गत तसेच मुख्य रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. अनेक रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून या खड्ड्यात पाणी साचल्याने चिखलाचा सामना करावा लागत आहे.
पावसाने महानगरातील रस्त्यांची वाट
ठळक मुद्देचंद्रपुरातील अंतर्गत रस्ते बनले धोकादायक : मनपा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष