शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

धर्मांध राजकारणामुळे देशाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 00:15 IST

धर्मांध राजकारणामुळे सर्वसामान्य जनतेसोबतच देशाचे प्रचंड नुकसान होते.

ठळक मुद्देराम पुनियानी : प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात व्याख्यान

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : धर्मांध राजकारणामुळे सर्वसामान्य जनतेसोबतच देशाचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे नव्या पिढीला धर्म आणि राजकारणातील मूलभूत भेद समजावून संविधानाच्या मूल्यांची जाणिव करून देणे आज काळाची गरज आहे, असे मत प्रसिद्ध विचारवंत व लेखक डॉ. राम पुनियानी यांनी व्यक्त केले.मुस्लीम एज्युकेशन, सोशन अ‍ॅन्ड कल्चरल आॅर्गनायजेशनतर्फे शनिवारी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात पार पडलेल्या ‘मजहब सियासत और आज के हालात’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.डॉ. पुनियानी यांनी इतिहासातील अनेक उदाहरणे देवून म्हणाले, कोणत्याही युगामध्ये धर्म आणि राजकारणाचा संबंध आला नाही. एक राजा दुसऱ्या राजाच्या साम्राज्यावर लढाई करण्यास जात होता. त्यावेळेला त्याचा उद्देश फक्त आपले साम्राज्य वाढविणे एवढाच होता. ही लढाई धर्माच्या नावावर नव्हती. अनेक मुसलमान राजांनी मुसलमान साम्राज्यावर आणि अनेक हिंदू राज्यांनी हिंदू साम्राज्यावर चढाई केल्याची उदाहरणे इतिहासाता आढळतात. अकबर बादशहाचे सेनापती हिंदू होते, तर शिवाजी महाराजांच्या दरबारात अनेक मुस्लीम व्यक्ती महत्त्वाच्या पदावर होते.परंतु, आजची परिस्थिती बदलली असून धर्म आणि राजकारणाला एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या आधारे देशातील सर्वधर्मसमभावाचे वातावरण बिघडविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आला. त्यामुळे या घटनांना आळा घातला पाहिजे. युवापिढीला सत्य इतिहास सांगून जागृत करण्यासाठी विवेकी व विज्ञाननिष्ठ संघटनांनी पुढे येण्याची गरज आहे, असेही पुनियानी यांनी व्याख्यानात नमूद केले.दीड तासाच्या भाषणामध्ये पुनियानी भारतातील अनेक ऐतिहासिक उदाहरण देऊन राजकारण व धर्मकारणातील चुका पुढे मांडल्या. चर्चासत्राप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे शहर अध्यक्ष नंदू नागरकर, विनोद दत्तात्रय, बळीराज धोटे, अ‍ॅड. खान, प्राचार्य डॉ. जावेद खान, रोटरी क्लबच सदस्य, शैक्षणिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने झाली. प्रास्ताविक मेस्कोचे अध्यक्ष हाजी शफीक अहमद केले.डॉ. पुनियानी यांचा परिचय अ‍ॅड. फरहत बेग यांनी करून दिला.काचवाला यांनी संचालन केले. हाजी वहीद खान यांनी आभार मानले. यावेळी डॉ. एजाज शेख, हमीद लालानी, नाहीद हुसेन, जहीरभाई काजी, शब्बीर पठाण, रहेमान पटेल, रफीक मारफाणी, हाजी अब्दुल बारी आदी उपस्थित होते.