शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

दारुड्या मुलाचा आईसह पत्नीवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला, पळसगाव येथील थरारक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 16:33 IST

जंगलात फरार झालेल्या आरोपी मुलाला अटक

चंद्रपूर : मद्यधुंद मुलाने आई व पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केल्याची खळबळजनक घटना चिमूर तालुक्यातील पळसगाव (पिपर्डा) येथे बुधवारी (दि. ९) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. पार्वता संभा मेश्राम व कल्पना मेश्राम अशी जखमींची नावे आहेत. हल्ल्यानंतर जंगलात पळालेल्या आरोपी मुलाला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. अरविंद संभा मेश्राम असे आरोपीचे नाव आहे. जखमी आईला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

पळसगाव येथील अरविंद मेश्राम हा बुधवारी सकाळी दारू पिऊन घरी आला. पत्नी कल्पना ही घरातील कामे करत होती. दरम्यान, शिवीगाळ करून पतीने तिला मारहाण सुरू केली. सुनेच्या मदतीसाठी आई पार्वता मेश्राम आडवी आली असता दोघींवरही कुऱ्हाडीने हल्ला केला. या घटनेत पतीला किरकोळ तर आई गंभीर जखमी झाल्याचे पाहून आरोपी मुलगा जंगलात पळाला. पत्नीने या घटनेची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी जखमी आईला तातडीने चिमूर रुग्णालयात दाखल केले.

आरोपी जंगलात पळाल्याची माहिती मिळताच चिमूर पोलिसांचे पथक सज्ज झाले. गुप्त माहितीच्या आधारे आरोपी विहिरगाव येथील बसस्थानक परिसरात असल्याचे कळताच त्याला ताब्यात घेण्यात आले. भादंवि ३०७, ३२४, ७०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली.

पार्वता मेश्राम यांची प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नीलेश चावरे, विनोद जांभुळे, बिट अंमलदार मेहरकुरे, पोलिस शिपाई भरत गोडवे, दगडू सरवदे करत आहेत.

पळसगाव येथील हल्ला प्रकरणातील आरोपीला अटक केली. उद्या न्यायालयात हजर करण्यात येईल. हल्ल्यात गंभीर झालेल्या पार्वता मेश्राम यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

- मनोज गभने, ठाणेदार, चिमूर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूर