शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ताडोबा सफारी करून जाताना औषध निरीक्षकाचा अपघातात मृत्यू, पत्नी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2023 20:29 IST

Chandrapur News कुटुंबीयासह ताडोबा सफारीसाठी गेल्यानंतर नागपूरकडे परतताना चिंधीमाल फाट्याजवळ झालेल्या कार अपघातात चंद्रपूर येथील औषध निरीक्षक चंद्रमणी कान्होजी डांगे (५१, रा. रवीनगर, नागपूर) यांचा मृत्यू झाला.

 

चंद्रपूर : कुटुंबीयासह ताडोबा सफारीसाठी गेल्यानंतर नागपूरकडे परतताना चिंधीमाल फाट्याजवळ झालेल्या कार अपघातात चंद्रपूर येथील औषध निरीक्षक चंद्रमणी कान्होजी डांगे (५१, रा. रवीनगर, नागपूर) यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी सुमना डांगे या गंभीर जखमी झाल्या. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ५:०० वाजताच्या सुमारास घडली.

चंद्रमणी डांगे हे आपल्या कुटुंबीय तसेच नातलगांसह १७ मे रोजी ताडोबा येथे सफारीसाठी गेले होते. दोन दिवस ताडोबात मुक्कामी होते. सफारी केल्यानंतर ते शुक्रवारी परतीच्या प्रवासासाठी नागभीडमार्गे नागपूरला निघाले होते. डस्टर कारमध्ये (एमएच ४० एसी ३०८३) पत्नी सुमन व मुलगी होती. ते स्वतः कार चालवीत होते, तर दुसऱ्या गाडीत त्यांचा साळा, साळ्याची पत्नी व मुले होती, अशी माहिती मिळाली आहे.

नागभीडमार्गे नागपूरला जात असताना त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर धडकली. धडक इतकी भीषण होती की, चंद्रमणी डांगे व त्यांची पत्नी गंभीररित्या जखमी झाले. त्याचवेळी तळोधीकडून नागभीडकडे येत असलेले नागभीड ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सचिन चिलबुले यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून लगेच रुग्णवाहिका बोलावली. चंद्रमणी डांगे आणि त्यांच्या पत्नीला नागभीडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र, डॉक्टरांनी डांगे यांना मृत घोषित केले. पत्नी सुमन यांना पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे हलविण्यात आले आहे. सुदैवाने त्यांच्या कारमध्ये असलेल्या त्यांच्या मुलीला काहीही इजा झाली नाही. विशेष म्हणजे, चंद्रमणी डांगे हे चार दिवसांपूर्वीच कार्यालयीन कामासाठी नागभीडला आले होते, अशी माहिती मिळाली आहे.

टॅग्स :Accidentअपघात