शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धरणाचे पाणी कंपन्यांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:15 IST

यावर्षी अपुरा पाऊस पडला. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कर्ज काढून शेती केलेल्या शेतकºयांना यावर्षी अडचणींचा सामना करावा लागणार असून उत्पादनापेक्षा खर्चात मोठी वाढ झाली आहे.

ठळक मुद्देपाण्याअभावी पिके लागली सुकायला : अमलनाला धरणाचे पाणी सोडण्याची मागणी

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : यावर्षी अपुरा पाऊस पडला. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कर्ज काढून शेती केलेल्या शेतकºयांना यावर्षी अडचणींचा सामना करावा लागणार असून उत्पादनापेक्षा खर्चात मोठी वाढ झाली आहे. यावर मात करायची असेल तर शेतपिकांना सिंचनाची सोय करणे आवश्यक आहे. राजुरा, कोरपना तालुक्यात सिंचनाच्या सोईसाठी मोठी धरणे आहेत. परंतु पिके सुकायला लागली तरी धरणाचे पाणी अजूनही शेतीला सोडण्यात आले नाही. धरणाचे पाणी खासगी कंपन्यांना दिले जात असून या धरणांचा शेतीला काय फायदा, असा प्रश्न आता शेतकरी विचारु लागले आहे.निसर्गाच्या पाण्यावर शेती करण्याचे दिवस आता जवळजवळ संपले आहेत. पावसाअभावी शेती बेभरवशाची झाली आहे. पाण्याशिवाय शेती करणे ही संकल्पनाच तशी अवघड आहे.शेतकºयांना रब्बी हंगाम करण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. यावर्षी पाऊस कमी पडला त्याचा मोठा फटका शेतीला बसला आहे.मंगी, उपरवाही, चंदनवाही, पाचगाव, पांढरपौणी, भूरकुंडा (बु.) इत्यादी गावे अमलनाला प्रकल्पात येतात. अमलनाला धरणाच्या पाण्यावर या परिसरातील शेतकरी शेती करतात. मात्र यावर्षी धरणाचे पाणी अद्यापही सोडण्यात आले नाही. त्यामुळे शेतीचा रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. कॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. काटेरी झुडपेही वाढली असून कॅनलची दुरुस्ती केली नसल्याने शेताच्या बांधापर्यंत पाणी पोहोचणे कठीण झाले आहे.कॅनलची दुरुस्ती करुन अमलनाला प्रकल्पाचे पाणी शेतीला सोडावे, अशी मागणी पाचगाव येथील शेतकरी तिरुपती इंदूरवार, दशरथ भोयर, सुधाकर गेडेकर, नानाजी विरदंडे, गजानन भेंडे, किसन पिंपळकर, सुरेश वांढरे, लक्ष्मण नुलावार, बाबुराव विरदंडे, रुपेश गेडेकर यांनी केली आहे. मागणीची दखल न घेतल्या प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.पाण्याअभावी शेतातील पीक सुकायला लागले आहे. परिसरात अमलनाला सारख्या मोठा सिंचन प्रकल्प असताना त्याचा फायदा शेतीला होताना दिसत नाही. अजूनपर्यंत अमलनाला धरणाचे पाणी शेतीला सोडण्यात आले नाही. त्यामुळे शेतीचा रब्बी हंगाम धोक्यात आला आहे.- दशरथ भोयर, शेतकरी पाचगाव .