शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरातील 37 लाखांच्या चोरीचा ‘मास्टरमाईंड’ निघाला चालकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 05:00 IST

या प्रकरणात तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १४ लाख १६ हजार ४०० रुपये रोख आणि ७६ तोळे सोने व चांदीचे दागिने किंमत २६ लाख २० हजार ३२३ असा एकूण ४० लाख ३६ हजार ७२३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. राजेंद्र रामपाल जयस्वाल यांनी काही महिन्यांपूर्वी वाहनचालक म्हणून असलेला सादिक रफीक शेख हा या घटनेचा मास्टरमाईंड निघाला, अशी माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवरचंद्रपूर : चंद्रपुरातील शिवाजीनगरात शुक्रवारी सकाळी उघडकीस आलेल्या ३७ लाखांच्या चोरीचा तडकाफडकी छडा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वात लावण्यात पोलिसांना यश आले आहे. इतकेच नव्हे, तर या प्रकरणात तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून १४ लाख १६ हजार ४०० रुपये रोख आणि ७६ तोळे सोने व चांदीचे दागिने किंमत २६ लाख २० हजार ३२३ असा एकूण ४० लाख ३६ हजार ७२३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. राजेंद्र रामपाल जयस्वाल यांनी काही महिन्यांपूर्वी वाहनचालक म्हणून असलेला सादिक रफीक शेख हा या घटनेचा मास्टरमाईंड निघाला, अशी माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी दिली. अटक केलेले तीनही आरोपी चंद्रपुरातील आहे. सादिक रफीक शेख (३२, रा. जलनगर), महेश गजानन श्रीरामवार (२३, रा. बालाजी वॉर्ड), चेतन कालिदास तेलसे (२२, रा. अष्टभुजा वॉर्ड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सादिक हा चोरीचा मास्टरमाईंड आहे. तो राजेंद्र रामपाल जयस्वाल यांच्याकडे वाहनचालक म्हणून काम करीत होता. काही महिन्यांपूर्वी जयस्वाल यांनी त्याला कामावरून कमी केले होते. त्यांना जयस्वाल यांच्या घराची इत्यंभूत माहिती होती. त्याने अन्य दोन आरोपींना हाताशी धरून हा चोरीचा कट रचला. त्यानुसार तिघेही गुरुवारी रात्री राजेंद्र जयस्वाल यांच्या घरी गेले. जयस्वाल हे घरी नव्हते. हे त्यांना माहिती होते. चौकीदार होता, मात्र तो झोपलेला होता. सादिकने घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख व सोन्या-चांदीचे दागिने काढले. अन्य दोघेजण बाहेर उभे होते. यानंतर तिघेही तेथून पसार झाले. सकाळी ही चोरीची घटना उजेडात आली.

यांनी केली कारवाईपोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, सचिन गदादे, रामनगरचे ठाणेदार प्रदीपकुमार शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अब्दुल मलीक, एकरे, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रकाश बल्की, नितीन साळवे, मिलिंद जांभुळे, सुभाष गोहोकार, धनराज करकाडे संजय आतकुलवार, अविनाश दशमवार, चंदू नागरे, अमजद खान, सुभाष गोहोकर यांच्यासह ४५ जणांनी ही कारवाई केली.

जप्त केलेला मुद्देमालसोन्याची चेन व लाॅकेट २३७ ग्रॅम, नऊ नग सोन्याच्या अंगठ्या २२३ ग्रॅम, सोन्याचा नेकलेस ५३.२३० ग्रॅम, पाच नग सोन्याच्या चेन ८७.८९० ग्रॅम, तीन नग सोन्याचे मंगळसूत्र १३२.२७० ग्रॅम असा एकूण ७६ तोळे साेन्याचे दागिणे जप्त केले.

चोरीला गेलेल्या मुद्देमालाशिवायही दागिणे जप्तचांदीचा कंबरपट्टा ३३९ ग्रॅम, सोन्याचा लेडीज कडा ५१.१५० ग्रॅम, चार जोड चांदीच्या चाळ ६०२ ग्रॅम, चांदीचे ब्रेसलेट ७.२३० ग्रॅम, चांदीचा छल्ला १९.७२० ग्रॅम, दोन चांदीचे करंडे ४५.२८ ग्रॅम, एक चांदी नाणे ५.२३ ग्रॅम असा मुद्देमालही हस्तगत केला आहे.

आरोपींना विविध ठिकाणाहून अटकसादीक शेख याला गडचिरोली, चेतन तेलसे याला नागपूर तर महेश श्रीरामवार याला चंद्रपूरातून अचक करण्यात आली आल्याची माहिती पोलीस अधीक्षक साळवे यांनी दिली.  

नकोडामध्ये ठेवला चोरीचा मुद्देमालआरोपींनी घुग्घुस गाठले. तेथे सादीकचा नातेवाईक शेख नवाझ शेख दादामियाँ (४३) रा. वार्ड क्रमांक १ नकोडा याच्याकडे चोरीचा मुद्देमाल ठेवून  विविध भागात गेले होते. पोलिसांनी शेख नवाझच्या घरून १४ लाख १६ हजार ४०० रुपये जप्त केले. 

 

टॅग्स :Thiefचोर