शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून शाळा सुरू करण्याची घाई नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST

राज्याच्या शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. मात्र, येत्या २६ जुनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची शिक्षण क्षेत्रात चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने पालक व शिक्षकांची मते जाणून घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याची तीव्रता वाढणार की कमी होणार, याबाबत सध्या काहीच ठोसपणे सांगता येतनाही. त्यामुळे शाळा सुरू झाल्या तरी पालक त्यांच्या पाल्यांना पाठविणार का, असा प्रश्न शिक्षकांकडून विचारला जात आहे.

ठळक मुद्देपालक, शिक्षकांचे मत : जिल्हा परिषदेच्या शाळा इमारती कोरोना क्वारंटाईनसाठी ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. जिल्हा परिषद शाळांच्या सर्वच इमारती संस्थात्मक क्वारंटाईनसाठी ताब्यात घेण्यात आल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेलाच आधी प्राधान्य दिले पाहिजे. मात्र, शासनाने लगेच शाळा सुरू करण्याची घाई करू नये, असे मत पालक, शिक्षक व शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.राज्याच्या शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप अधिकृत घोषणा केली नाही. मात्र, येत्या २६ जुनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची शिक्षण क्षेत्रात चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने पालक व शिक्षकांची मते जाणून घेतली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याची तीव्रता वाढणार की कमी होणार, याबाबत सध्या काहीच ठोसपणे सांगता येतनाही. त्यामुळे शाळा सुरू झाल्या तरी पालक त्यांच्या पाल्यांना पाठविणार का, असा प्रश्न शिक्षकांकडून विचारला जात आहे. विविध शाळांमधील विद्यार्थी संख्या लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करणे, दोन सत्रांमध्ये शाळा भरविणे आदी अडचणीचे ठरणारे आहे. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव कमी होईपर्यंत शाळा सुरू नये. यंदाचे शैक्षणिक वर्षे उशिरा सुरू करताना अभ्यासक्रमाचे नव्याने दृष्टीने नियोजन करण्याची मागणी पालक व शिक्षकांनी केली आहे.प्रतिबंधासाठी पर्याय स्वीकारामुलांनी एका बेंचवर एकालाच बसविणे, शाळांचे तास करणे, आजारी विद्यार्थी-शिक्षकांनी शाळेत न येणे, स्वच्छतागृहांची वारंवार स्वच्छता करणे, आदी पर्यायांचा स्वीकार शिक्षण विभागाला करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची असून शैक्षणिक नुकसान होणार नाही, याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर अनिवार्य केला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवीन शैक्षणिक वर्ष आणि अभ्यासक्रम काही प्रमाणात कमी करण्याचा विचारही करता येऊ शकतो.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन शाळा सुरू झाल्याच पाहिजे. मात्र, त्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. जि. प. शाळांच्या इमारती क्वारंटाईनसाठी असल्याने लगेच सत्र सुरू करणे धोकादायक ठरू शकते. शासनाने याबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा.-विलास बोबडे, अध्यक्ष, म. रा. शि.प., चंद्रपूरविद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानीचा विचार करता जिथे कोरोनाचा एकही रूग्ण नाही तेथील शाळा सुरू केल्या पाहिजे. पण, शासनाने शाळेतील सर्वांना प्रतिबंधात्मक साधने उपलब्ध करून द्यावी. शिक्षक शाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याची खबरदारी निश्चितपणे घेतील.-जे.डी. पोटे, निमंत्रित सदस्य,शिक्षण समिती जि. प. चंद्रपूरशाळा सुरू व्हावी असे वाटत असले तरी धोकादायकही ठरू शकते. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांना डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घ्यावा. ज्या शाळांतील विलगीकरण कक्षात ठेवलेल्या शेवट्या व्यक्तीची सुट्टी होते. तिथून १५ दिवसांपेक्षा जास्त अंतराने शाळा सुरू करावी. सुरवातीचे काही दिवस सुट्टीत गेले तरी भरून काढता येईल.-हरीश ससनकर, संयोजक क्रीएटीव्ह टीचर फोरम चंद्रपूरशाळा सुरू करण्याचा अद्याप आदेश आला नाही. शासनाने निर्देर्शित केल्यानुसारच जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये आवश्यक खबरदारी घेण्यात येईल. कोरोनापासून बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत. शैक्षणिक सत्र सुरू करण्यापूर्वी मुलांच्या आरोग्याचा प्रश्न गांभीर्याने लक्षात घेण्यात येणार आहे.-दीपेंद्र लोखंडे, शिक्षणाधिकारी(प्राथमिक), जि. प. चंद्रपूरजि. प. शाळांच्या इमारती क्वारंटाईनसाठी देण्यात आल्या. कोरोनाची साथ कधी संपेल, याची काही खात्री नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची काळजी घेण्याची मोठी जबाबदारी शासनाची आहे. शैक्षणिक सत्र वाया जाईल, या धास्तीने शासनाने धोका पत्करू नये.-शंकर भेंडे, पालक चंद्रपूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा