शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

भाजप काय आपल्या खिशातून महिलांना १५०० रुपये देते काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 12:55 IST

विजय वडेट्टीवारांचा सवाल : महिलांची मेळाव्याला उत्स्फूर्त गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क ब्रह्मपुरी : भाजप खासदार महाडिक यांनी भर सभेत १५०० रुपये घेऊन काँग्रेसच्या मेळाव्यात जाणाऱ्या महिलांवर लक्ष ठेवा, फोटो काढा सांगितले. इतकेच नाहीतर त्यांची व्यवस्था करतो, अशी धमकी दिली. भाजप काय आपल्या खिशातून राज्यातील महिलांना निधी देत आहे का? लाडक्या बहिणींना भाजपकडून धोका आहे, असे चित्र आहे, म्हणूनच महायुती सरकारला सत्तेतून हाकलून लावा, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. 

मतदारसंघातील गांगलवाडी येथे रविवारी पार पडलेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला मंहिलांची उत्स्फूर्त गर्दी होती. मेळाव्याला विमुक्त जाती भटक्या जमाती प्रदेशाध्यक्ष पल्लवी रेणके, तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समिती सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प. सभापती डॉ. राजेश कांबळे, प्रमोद चिमूरकर, कम्युनिस्ट नेते विनोद झोडगे, जिल्हा उपाध्यक्ष विलास विखार, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, कल्पना गेडाम, मंदा चौके, किशोर राऊत मंचावर उपस्थित होते. 

वडेट्टीवार म्हणाले, मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी गोसेखुर्द प्रकल्पाचे ५ हजार कोटींचे काम आघाडी सरकार असताना सुरू केले. या प्रकल्पाला निधी मिळावा, म्हणून झगडावे लागले. पण, यामुळे संपूर्ण क्षेत्रातील ८० टक्के शेती ओलिताखाली आली आहे. रस्ते, शैक्षणिक घरकूल योजना, दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांकरिता वसतिगृहे, वाचनालय, गावागावात सामाजिक सभागृहे, शुद्ध पेयजल योजना, क्रीडांगणाचा विकास, आरोग्य व प्रशासकीय सेवेसाठी प्रशस्त इमारती यासाठी आमदार म्हणून कामाचा लेखाजोगा वडेट्टीवार यांनी मांडला. ब्रह्मपुरीमध्ये मी लोकप्रतिनिधी नाही, तर तुमचा भाऊ म्हणून काम करतो, भगिनींच्या पाठीशी वेळोवेळी उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी मार्गदर्शनपर युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या, भाजपकडे टीका करण्यासारखे काहीच नसल्याने खोटे बोलून रडीचा डाव सुरू आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारchandrapur-acचंद्रपूर