शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

नेदरलँड महोत्सवात चंद्रपूरच्या युवकाची डाॅक्युमेंटरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 06:31 IST

युवकांसाठी बनविण्यात येणाऱ्या डाॅक्युमेंटरीच्या विभागात जगातून आलेल्या तीन हजार एंट्रींमधून केवळ नऊ डाॅक्युमेंटरी निवडण्यात आल्या. त्यात भारतातून ‘महल्लेंची शाळा-फॅमिली गोइंग लाइव्ह’ या एकमेव डाॅक्युमेंटरीची निवड झाली.

- आशिष देरकर

कोरपना (जि. चंद्रपूर) : ‘एफटीआयआय’च्या शेवटच्या वर्षात फिल्म सिनेमॅटोग्राफीचे शिक्षण घेत असलेल्या चंद्रपूर येथील अक्षय प्रदीप इंगळे या युवकाने लॉकडाऊनमध्ये घरी असताना केलेल्या डॉक्युमेंटरीची निवड जगातील डॉक्युमेंटरीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या नेदरलँड येथील ‘इडफा’ (आंतरराष्ट्रीय माहितीपट चित्रपट महोत्सव ॲमस्टरडॅम, नेदरलँड) या महोत्सवासाठी झाली आहे. 

युवकांसाठी बनविण्यात येणाऱ्या डाॅक्युमेंटरीच्या विभागात जगातून आलेल्या तीन हजार एंट्रींमधून केवळ नऊ डाॅक्युमेंटरी निवडण्यात आल्या. त्यात भारतातून ‘महल्लेंची शाळा-फॅमिली गोइंग लाइव्ह’ या एकमेव डाॅक्युमेंटरीची निवड झाली. लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन पद्धतीने सुरू असणाऱ्या शाळेसाठी इंटरनेट व इतर सुविधा पूर्णपणे उपलब्ध नसतानाही ऑनलाइन शाळेच्या माध्यमातून शिक्षण घेण्यासाठी रोज गणवेश घालून मोबाइल स्क्रीनसमोर बसून दुसऱ्या वर्गात शिकणारी जानू, चौथ्या वर्गात शिकणारा वेदू, घर सांभाळत मुलांसोबत असणारी आई दीपिका व स्वतः विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेणारे शिक्षक वडील उमेश या महल्ले कुटुंबावर केलेली ही निरीक्षणात्मक डाॅक्युमेंटरी आहे. त्यात लॉकडाऊनमध्ये सुरू असलेल्या शाळेतील ही मुले कधी अभ्यासात रमतात, तर कधी कंटाळून बालिशपणे आई-वडिलांविरुद्ध बंड पुकारतात. या घडामोडींत निर्माण होणाऱ्या घरगुती गमती-जमतीवर हा लघुचित्रपट उपहासात्मक टीका करतो.

 औरंगाबादला इंजिनीअरिंगअक्षयचे वडील प्रदीप इंगळे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र ऊर्जानगरमध्ये कार्यरत असल्यामुळे त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण चंद्रपूरमध्ये झाले. पुढे औरंगाबादला इंजिनीअरिंग करून पहिल्याच प्रयत्नात भारतातून १० लोकांमध्ये निवड होऊन त्याने एफआयआयटीमध्ये स्थान पटकावले.

एकखांबी तंबू२०२० च्या लॉकडाऊनमध्ये अक्षयने ही डॉक्युमेंटरी शूट केली. लॉकडाऊन नियमांचे पालन करण्यासाठी या माहितीपटात त्याने आपल्या बहिणींच्या परिवारातील सदस्यांनाच कलावंत म्हणून घेतले. छायाकार, संकलक, दिग्दर्शन, ध्वनिमुद्रण अशा अनेक बाजू त्याने स्वत: सांभाळल्या आहेत.  उल्लेखनीय बाब म्हणजे त्याने साधनांची स्वत: जुळवाजुळव करून निर्मितीचे बरेच कार्य घरीच पूर्ण केले आहे. या माहितीपटाच्या १० मिनिटांच्या भागाची गुणवत्ता बघून त्याच्या पुढील पूर्णत्वासाठी ‘पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंग ट्रस्ट’ या शासकीय संस्थेने आर्थिक अनुदान दिले आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र