शहरं
Join us  
Trending Stories
1
मोस्ट वॉन्टेड अनमोल बिश्नोईला भारतात आणले जाणार; पण पुढे काय कारवाई होणार?
2
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
3
“राजन पाटलांच्या वाया गेलेल्या कार्ट्यांना सत्तेचा माज…”, बाळराजे पाटलांना अजितदादांच्या आमदाराने सुनावले
4
लग्नसराईच्या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक; पाहा नवी किंमत
5
"मॅचच्या ४ दिवस आधी BCCIचे क्यूरेटर आले अन्.."; कोलकाता पिच वादावर सौरव गांगुलीचा खुलासा
6
१,२,३,४... बाप रे बाप...! एका ऑटोरिक्‍शातून बाहेर पडली तब्बल 22 मुलं! व्हिडिओ बघून धक्का बसेल
7
९४% रिटर्न दिल्यावर 'ग्रोव'ला १०% लोअर सर्किट! गुंतवणूकदारांनी शेअर विकायला का लावली रांग?
8
प्रशासकीय दिरंगाईमुळे बोनस रखडला; संतप्त कामगारांचे नायर रुग्णालयासमोर 'बोंबाबोंब' आंदोलन
9
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
10
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
11
“आता ‘प्रो बैलगाडा लीग’ लवकरच, महाराष्ट्राचा गौरवशाली वारसा...”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
12
सरकारच्या 'या' स्कीममध्ये मिळवा विना गॅरेंटी व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन; केवळ एका डॉक्युमेंटची लागेल गरज
13
मुलांच्या भवितव्याशी खेळ! Noge, Eare, Iey... चुकीचं इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाचा Video व्हायरल
14
आरक्षण मर्यादेचं उल्लंघन, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी, सुप्रिम कोर्टात आज काय घडलं
15
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
16
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
17
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
18
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
19
'अजित पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक...", राणा जगजितसिंह यांचं सुप्रिया सुळेंना पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
"पंतप्रधान मोदींमुळे माझ्या आईचा जीव वाचला..."; शेख हसीना यांचा मुलगा सजीब यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

परिश्रम करा, यश हमखास मिळेल

By admin | Updated: February 29, 2016 00:34 IST

कलावंतांनी परिश्रम केल्यास यश हमखास मिळते. कलावंतांनी आरसा आणि सावली याप्रमाणे सहकारी कलावंतांसह नाती जोपासावी.

आशालता यांचे प्रतिपादन : नवोदिताचा कलासाधक सन्मान प्रदान सोहळा चंद्रपूर : कलावंतांनी परिश्रम केल्यास यश हमखास मिळते. कलावंतांनी आरसा आणि सावली याप्रमाणे सहकारी कलावंतांसह नाती जोपासावी. कारण आरसा खरे तेच सांगतो आणि सावली कधीच साथ सोडत नाही. हा माझ्या गुरूंनी दिलेला सल्ला मला आयुष्यभर कामी आला, असे मनोगत ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांनी व्यक्त केले.मराठी राजभाषा दिवस तसेच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जयंती दिनानिमित्त नवोदिता चंद्रपूर या संस्थेतर्फे आयोजित कलासाधक सन्मान प्रदान सोहळ्यात त्या बोलत होत्या. हिंदी व मराठी चित्रसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांच्या हस्ते डॉ. जयश्री कापसे-गावंडे यांना कलासाधक सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी मंचावर अर्थ व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, सिने नाटय अभिनेते श्रीकांत देसाई, देवेंद्र गावंडे, नवोदिताचे अध्यक्ष शरद गुप्ता, सचिव प्रशांत कक्कड यांची उपस्थिती होती. सन्मानचिन्ह, साडी, श्रीफळ, मानपत्र देऊन आशालता वाबगावकर आणि ना. सुधीर मुनगंटीवार यांनी डॉ. जयश्री कापसे यांना कलासाधक सन्मान प्रदान केला.यावेळी बोलताना ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरची यशोपताका चंद्रपूरकर कलावंतांनी मुंबईसह राज्याबाहेरही फडकावली आहे. ही अभिमानाची बाब आहे. जयश्री कापसे यांचा रंगप्रवास हौशी रंगभूमीवरील कलावंतांसाठी प्रेरणादायी आहे. येत्या काळात चंद्रपूरचे सांस्कृतिक वैभव अधिक संपन्न व्हावे, या दृष्टीने जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून प्रयत्न करेन, असेही ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. नाट्यक्षेत्राच्या माध्यमातून कलेची सेवा करताना जे समाधान मिळतं, आनंद मिळतो तो केवळ अवर्णनीय असतो. माझ्या रंगप्रवासात अनेक चढ उतार मी अनुभवले. पण कुटुंबीयांच्या सहकार्याने सहकारी कलावंतांच्या प्रोत्साहनाने तसेच रसिक प्रेक्षकांच्या शुभेच्छांमुळेच मी आज इथे उभी आहे. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत रंगसेवा करेन, असे प्रतिपादन डॉ. जयश्री कापसे-गावंडे यांनी सत्काराला उत्तर देताना केले.यावेळी देवेंद्र गावंडे, श्रीकांत देसाई यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक अजय धवने यांनी केले. मानपत्राचे वाचन आशिष अंबाडे यांनी केले. नवोदिताच्या ‘चिंधीबाजार’ या नाटकाचा यशोप्रवास उलगडणाऱ्या ‘मेकिंग आॅफ चिंधीबाजार’ या पुस्तकाचे विमोचन यावेळी पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुशील सहारे, नूतन धवने, धनंजय धनगर, संजय पुरकर, सचिन घोडे या कलावंतांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी केले. (शहर प्रतिनिधी)कलासाधक सन्मान प्रदान सोहळयानंतर डॉ. जयश्री कापसे-गावंडे यांच्या रंगप्रवासावर दृष्टिक्षेप टाकणारा ‘अशी ही जयश्री’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात रोहिणी उईके, बबिता उईके, मेघा मेश्राम, गायत्री देशपांडे, अश्विनी खोबरागडे, धीरज भट, रितेश चौधरी, अंकुश दारव्हेकर, विनोद वाडेकर, सुरज रंगारी, विशाल ढोक, संजय पूरकर, जगदीश नंदूरकर, स्नेहीत पडगिलवार, मेघना शिंगरू, बकुळ धवने, अवनी शिंगरू, राजू आवळे आदींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन धनंजय धनगर यांनी केले.