शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीची खरेदी दणक्यात; 400 कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2021 05:00 IST

कोरोनामुळे दोन वर्षांपासून बाजारपेठाची स्थिती अतिशय वाईट झाली होती. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मोठे, मध्यम, लघू व सूक्ष्म उद्योगांना टाळे लागले. जीवनावश्यक वस्तु खरेदीच्याप बाजारपेठाची रया गेली. कोरोना संसर्गाची स्थिती ओसरल्याने यंदा व्यावसायिकांनी भांडवल गुंतवून नवीन माल भरला तर नागरिकांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी लगबग केली. खरेदीमुळे चंद्रपुरातील बाजारपेठ गर्दीने फुलून गेला आहे. लहान- मोठी दुकानांवरही ग्राहक दिसून येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ऐन दिवाळीतच कोरोना ओसरू लागल्याने यंदा नागरिकांनी दणक्यात खरेदी केली. परिणामी, बाजाराने उसळीने घेतली असून आठवडाभरात चंद्रपूर व जिल्ह्यात सुमारे ४०० काेटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. पुढील आठवडाभर खरेदीचा माहोल कायम राहिल्यास ही उलाढाल एक हजार कोटींच्या घरात जाऊ शकते.कोरोनामुळे दोन वर्षांपासून बाजारपेठाची स्थिती अतिशय वाईट झाली होती. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर मोठे, मध्यम, लघू व सूक्ष्म उद्योगांना टाळे लागले. जीवनावश्यक वस्तु खरेदीच्याप बाजारपेठाची रया गेली. कोरोना संसर्गाची स्थिती ओसरल्याने यंदा व्यावसायिकांनी भांडवल गुंतवून नवीन माल भरला तर नागरिकांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी लगबग केली. खरेदीमुळे चंद्रपुरातील बाजारपेठ गर्दीने फुलून गेला आहे. लहान- मोठी दुकानांवरही ग्राहक दिसून येत आहेत. नोकरदारांप्रमाणेच सर्वसामान्य नागरिकांनीही तालुकास्थळावरील बाजारात येऊन वस्तुंची खरेदी केली. गतवर्षी बोनसचा पत्ता नव्हता. यंदा नोकरदार व कामगारांच्या हातात दिवाळीपूर्वीच बोनस पडल्याने बाजारात चैतन्य दिसून आले. यंदाच्या दिवाळीला प्रत्येकानेच कपडे, इलेक्ट्रानिक्स व अन्य जीवनावश्यक वस्तु खरेदीला प्राधान्य दिले. त्यामुळे या आठवडभरात चंद्रपुरात सुमारे २०० कोटी तर जिल्ह्यात २०० कोटी असे एकूण ४०० कोटींची उलाढाल झाल्याची शक्यता आहे. दिवाळीची खरेदी अजुनही सुरूच असल्याने ही उलाढाल पुन्हा वाढणार आहे. 

दागिने खरेदीत २० टक्क्यांनी वाढ

- चंद्रपुरातील सराफा बाजारात गत वर्षीच्या तुलनेत यंदा सोने व चांदी खरेदीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. - कोरोनाने जोरदार फटका बसला होता. सध्या तरी व्यापारी वर्गात उत्साह आहे. काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर ५० हजारांवर जाऊन पोहचले होते. मात्र, आता सोन्याचे दर हे ३०० रुपयांनी कमी झाले. - शुद्ध सोन्याचे दर हे ४९ हजार ७०० वर आले आहे. २२ कॅरेट सोन्याचे दर ४५ हजार ७०० आहे. मात्र, चांदीचे दर वाढले आहे. - आठवडाभरापूर्वी चांदीचे दर ६५ हजारांवर होते. त्यामध्ये वाढ होऊन ६९ हजार रूपये झाली आहे. 

कोरोनाच्या संकटातून बाहेर निघत असताना यंदाची दिवाळी बऱ्यापैकी उत्साहात साजरी होत आहे. खरेदीमुळे उलाढालही वाढली. बाजारात पैसा आला तरच अर्थव्यवस्थेला तेजी येईल.   बाजाराची स्थिती १०० टक्के बदलायला बराच वेळ आहे. मात्र, त्यादृष्टीने वाटचाल सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत.- सदानंद खत्री, अध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ, चंद्रपूर

फटाक्यांचीही बंपर विक्रीगतवर्षीपासून फटाका बाजार बंद होता. यंदा चंद्रपुरातील कोनेरी तलाव व बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथील बाजारात फटाक्यांचीही बंपर विक्री झाली. नागरिकांनी स्वदेशी आकाश कंदील खरेदीला पसंती दिल्याचे दिसून आले. कमळाच्या फुलासारखा आकार आणि त्यावर लक्ष्मीचे चित्र असलेले कमळ आकाश कंदील, फोमचे आकाश कंदील, मेटल कंदील, फायबर कंदील, गोल कंदील, आनार कंदील, लाकडी झोपडीचा कंदील, कागदी कंदील अशा वेगवेगळ्या आकर्षक कंदिलांच्या विक्रीने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.

 

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021Marketबाजार