शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदावरून खडाजंगी

By admin | Updated: November 24, 2014 22:54 IST

चंद्रपूरच्या माजी महापौर संगिता अमृतकर यांना महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केल्यानंतर महिला काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी उडाली आहे. या निवडीवर महाराष्ट्र प्रदेश

चंद्रपूर : चंद्रपूरच्या माजी महापौर संगिता अमृतकर यांना महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड केल्यानंतर महिला काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये खडाजंगी उडाली आहे. या निवडीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या चिटणीस व नगरसेविका सुनिता लोढिया यांनी आक्षेप घेत थेट राजीनाम्याचा इशारा दिला. त्यामुळे हा वाद महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा दालनात गेला. अखेर प्रदेशाध्यक्षांच्या निर्देशावरून निरीक्षकांना चंद्रपुरात येऊन महिला काँग्रेस कार्यकर्त्यांची मते जाणून घ्यावी लागली. माजी महापौर संगिता अमृतकर यांची महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर जिल्ह्यातील महिला काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होऊ लागला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या चिटणीस व नगरसेविका सुनिता लोढिया यांनी तर ही निवड रद्द न केल्यास राजीनामा देऊ, असा इशाराच एका पत्रकार परिषदेतून दिला होता. या निवडीवरून वाद आणखीच वाढत जात असल्याने संगिता अमृतकर यांच्या निवडीला वरिष्ठ पातळीवर स्थगनादेश देण्यात आला आहे. त्यानंतर महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या निर्देशावरून महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष वनमाला राठोड व सचिव सीमा भुरे या पक्षाच्या निरीक्षक म्हणून चंद्रपुरात दाखल झाल्या. येथील विश्रामगृहात त्यांनी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. याप्रसंगी महिला पदाधिकाऱ्यांनी निरीक्षकांपुढे आपला रोषही व्यक्त केला. माजी महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नंदा अल्लूरवार यांनी सांगितले की तीन महिन्यांपूर्वी त्यांनी आपला राजीनामा पक्षाच्या सुपूर्द केला होता. त्यानंतर आजपर्यत, पक्षाने आपला राजीनामा स्वीकृत केला की नाही, हे सांगण्याचे सौजन्यही वरिष्ठ नेत्यांनी दाखविले नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याची कोणालाही आवश्यकता वाटली नाही. महिला काँग्रेसला पक्षाकडून गंभीरतेने घेतलेच जात नसल्याने आपण राजीनामा दिल्याचे अल्लूरवार यांनी निरीक्षकांना सांगितले. वरोरा विधानसभेतून काँग्रेसच्या उमेदवार राहिलेल्या आसावरी देवतळे यांनीही पक्ष पदाधिकाऱ्यांच्या निवड प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नसल्याचा आरोप केला.पक्षातील निष्ठावान महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पदावर नियुक्ती केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली. प्रदेश सचिव सुनिता लोढिया यांनी तर वरिष्ठांच्या या निवडीवरच तिव्र आक्षेप घेतला. जी महिला काँग्रेसची कार्यकर्ती प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचा व्हीप झुगारून महापौर पदासाठी भाजपाच्या उमेदवाराला मतदान करते, तिलाच प्रदेश काँग्रेस चार दिवसात जिल्हाध्यक्ष कसे काय बनवितात ? वरिष्ठांचे असेच निर्णय होत राहिले तर महिला कार्यकर्त्यांमधील पक्षाप्रति निष्ठा संपुष्टात येईल. मनपाचे स्थायी समिती सभापती रामू तिवारी यांच्या नेतृत्वात माजी महापौर संगिता अमृतकर यांच्या गटानेही निरीक्षक वनमाला राठोड यांची भेट घेतली. पदावर नियुक्ती करण्याची आमची मागणी नव्हती. पक्षानेची ही जबाबदारी सोपविली. त्याची अंमलबजावणी केली जात आहे. मनपातील काँग्रेसचे गटनेता संतोष लहामगे यांनी वरिष्ठ याबाबत जो निर्णय घेईल, तो मान्य असल्याचे सांगितले. (शहर प्रतिनिधी)