जिल्हा नियोजन विभागाचे कामकाज होणार पेपरलेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 06:00 AM2019-11-24T06:00:00+5:302019-11-24T06:00:37+5:30

या प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा नियोजन विभागाच्या कारभारत या आर्थिक वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून आयपास नावाची संगणकीय यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.

The district planning department will be working paperless | जिल्हा नियोजन विभागाचे कामकाज होणार पेपरलेस

जिल्हा नियोजन विभागाचे कामकाज होणार पेपरलेस

Next
ठळक मुद्देएका क्लिकवर माहिती । कामात पारदर्शकताही येणार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा नियोजन विभागाच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकारने इंटिग्रेटेड प्लॅनिंग ऑफिस ऑटोमेशन प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून संपूर्ण विभागाचे कामकाज पेपरलेस होणार असून एडमिन जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन अधिकारी असणार आहेत.
या प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा नियोजन विभागाच्या कारभारत या आर्थिक वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून आयपास नावाची संगणकीय यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. नियोजन विभागातील टपालाच्या व्यवस्थापन कामाचे, सनियंत्रण कामाचे, भौगोलिक स्थान कामाचे प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून ते पूर्ण होईपर्यंत व्यवस्थित निधीचे व्यवस्थापन, विविध स्तरांवरील डॅशबोर्ड या प्रणालीत समावेश असणार आहे. शासनाच्या विविध विभागातील यंत्रणा या ऑनलाईन पद्धतीने जोडल्या जाणार आहे. कामाचे प्रस्ताव प्राप्त होण्यापासून काम पूर्णत्वाचा दाखला आणि निधी विवरणापर्यंत सर्व कामे आता ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. यासाठी कुठलीही फाईल निरनिराळ्या विभागात फिरण्याची गरज भासणार नाही. ही सर्व कामे आता एका क्लिकवर होणार आहे. १ एप्रिलपासून प्रत्येक प्रणाली प्रत्यक्षात कार्यान्वित केली जाणार आहे. त्यानंतर नियोजन विभागाचा कारभार पेपरलेस होणार आहे.

Web Title: The district planning department will be working paperless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.