जिल्हा रुग्णालय व चंद्रपूर मेडिकल कॉलेज टेलिकन्सल्टसीने एम्सला जोडणार : डॉ. भारती पवार

By राजेश मडावी | Published: December 29, 2023 03:36 PM2023-12-29T15:36:40+5:302023-12-29T15:36:57+5:30

विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत माहिती

District Hospital and Chandrapur Medical College will be connected to AIIMS through teleconsultancy Dr Bharti Pawar | जिल्हा रुग्णालय व चंद्रपूर मेडिकल कॉलेज टेलिकन्सल्टसीने एम्सला जोडणार : डॉ. भारती पवार

जिल्हा रुग्णालय व चंद्रपूर मेडिकल कॉलेज टेलिकन्सल्टसीने एम्सला जोडणार : डॉ. भारती पवार

चंद्रपूर : जिल्हा रुग्णालय किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गंभीर आजाराच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी नागपूर किंवा अन्य रुग्णालयात न्यावे लागते. यात वेळ आणि पैसाही खर्च होतो. प्रसंगी रुग्णांचा मृत्यू होतो. त्यामुळे अशा रुग्णांना जिल्हा रुग्णालये किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आजारावर उपचार व्हावे यासाठी जिल्हा रुग्णालय आणि चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपुरातील एम्सला टेलिकन्सलटन्सीने जोडण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी चंद्रपुरात गुरुवारी (दि. २८) शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, जि. प. सीईओ विवेक जॉन्सन, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, राहुल पावडे उपस्थित होते. राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, काही दिवसांपूर्वी खनिज विकास निधीच्या बैठकीत काही कामे प्राधान्याने करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात आरोग्य क्षेत्राचा समावेश आहे. जिल्ह्यातील आरोग्य सेवा दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण प्रयत्न करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरोग्य सुविधांसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून निधीची मागणी केली होती. यानंतर केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असून, या निधीतून अनेक कामे केली जात आहे. काही कामे प्रगतिपथावर आहेत, अशी माहिती डॉ. पवार यांनी दिली.

लॅबसाठी प्रस्ताव आल्यास एक कोटी देणार
कोरोना काळात पीएम रिलिफ फंडातून पहिल्या टप्प्यात २२ कोटी रुपये, तर दुसऱ्या टप्प्यात १४ कोटींचा निधी देण्यात आला. उच्च दर्जाच्या लॅबसाठी प्रस्ताव आल्यास १ कोटीचा निधी उपलब्ध करून देऊ. जिल्ह्यातील वेगवेगळ्या आरोग्य सुविधांसाठी आतापर्यंत ४८ ते ५० कोटींचा निधी मिळाल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांनी सांगितले.

५ लाख लाभार्थ्यांना कार्ड वितरण
जिल्ह्यातील ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट सुरू आहे. टेलिकन्सलटन्सीने ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरेाग्य केंद्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला जोडण्यात आली. काही ठिकाणी असे प्रयोग सुरू आहेत. १७ लाख लाभार्थ्यांना आयुष्मान आरोग्य कार्ड दिले जाणार असून, ५ लाख लाभार्थ्यांना वितरण केले. साथीच्या आजाराचा सामना करण्यासाठी देशाची आरोग्य सज्ज व तत्पर असल्याचे डॉ. पवार या वेळी नमूद केले.

Web Title: District Hospital and Chandrapur Medical College will be connected to AIIMS through teleconsultancy Dr Bharti Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.