शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
5
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
6
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
7
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
8
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
9
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
10
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
11
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
12
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
13
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
14
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
15
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
16
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
17
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
18
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
19
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
20
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!

जिल्हा समितीच करणार नगर परिषद हद्दीतील भूमापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:01 IST

जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद हद्दीतील क्षेत्राचे नगर भूमापन करण्यासाठी २६ मे २०१८ रोजी उच्च समिती गठित करण्यात आली. त्यानुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी १६ सप्टेंबर २००८ रोजी बैठक घेतली होती.

ठळक मुद्देदिरंगाई संपणार : विभागीय आयुक्तांकडे केवळ सनियंत्रणाची जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : नगर परिषद हद्दीतील भूमापन करण्याची जबाबदारी यापूर्वी विभागीय स्तरावरील समितीकडे होती. मात्र, प्रशासकीय कामांची व्याप्ती वाढल्याने भूमापनाची कामे रखडली. त्यावर पर्याय म्हणून आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीच ही कामे करणार असून विभागीय आयुक्तांकडे केवळ सनियंत्रणाची जबाबदारी देण्याचा शासन निर्णय महसूल व वन विभागाचे कक्ष अधिकारी र. धों. कटके यांनी जारी केला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील नगर परिषद प्रशासकीय वर्तुळात समाधान व्यक्त केले जात आहे.जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अध्यक्षतेखाली नगर परिषद हद्दीतील क्षेत्राचे नगर भूमापन करण्यासाठी २६ मे २०१८ रोजी उच्च समिती गठित करण्यात आली. त्यानुषंगाने जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी १६ सप्टेंबर २००८ रोजी बैठक घेतली होती.राज्यात पाच विभागात असलेल्या खासगी संस्थेच्या निश्चितीकरणासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीय स्तरावर समिती नेमण्यात आली होती. मात्र विभागीय आयुक्तांच्याकडे असणारा कामाचा व्याप व मोठे कार्यक्षेत्र असल्यामुळे सहा विभागाच्या विभागीय स्तराची समितीकडे फक्त सनियंत्रणाची जबाबदारी ठेवण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तीय समिती स्थापन करण्याबाबत २२ सप्टेंबर २००९ रोजी निर्णय घेण्यात आला होता. मात्र, यासंदर्भात यापूर्वीच्या सरकारने अंमलबजावणी केली नव्हती. त्यामुळे नगर परिषदांच्या हद्दीतील क्षेत्राचे नगर भूमापन खासगी संस्थाकडून करून घेण्याबाबत जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख यांना प्रदान केलेले सर्व अधिकारी आता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीला देण्यात आला आहे.जिल्हा समितीत आठ सदस्यजिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीत सदस्य सचिव जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, उपजिल्हाधिकारी, सहाय्यक संचालक, उप अधीक्षक भूमी अभिलेख, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी, नगर परिषदांचे कर विभाग प्रमुख आदी नऊ जणांचा समावेश आहे.पूर्वी भूमापनाचे अधिकार आयुक्तांकडे असल्याने सीमांकन होण्यास उशीर लागत असे. आयुक्त कार्यालयालाच सर्व विभागाचे काम पहावे लागायचे. आता जिल्हाधिकाऱ्यांना हा अधिकार प्राप्त झाल्याने प्रकरणांचा तात्काळ निपटारा होईल. न. प. ला पाठपुरावा करणेही सोपे झाले आहे.- गणेश तर्वेकर,उपाध्यक्ष, न.प.नागभीड

टॅग्स :Socialसामाजिक