शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

जिल्हाधिकाऱ्यांना मिळाले गाढव वाचविण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 12:16 AM

राज्यात गाढवांची संख्या दरवर्षी घटत असल्याचे उघडकीस आल्याने जिल्हानिहाय गाढवांची संख्या किती आहे, याची माहिती संकलित करण्याचे आदेश राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त डी. डी. फरकाडे यांनी राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना दिला.

ठळक मुद्देगणना सुरू होणार । गणनेची जबाबदारी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्यात गाढवांची संख्या दरवर्षी घटत असल्याचे उघडकीस आल्याने जिल्हानिहाय गाढवांची संख्या किती आहे, याची माहिती संकलित करण्याचे आदेश राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त डी. डी. फरकाडे यांनी राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना दिला. हा आदेश जिल्ह्यात धडकल्याने पशुसंवर्धन विभागाच्या पथकाला गाढवांची माहिती संकलित करावी लागणार आहे.गाढव हा प्राणी कष्टाळू म्हणून जगभरात ओळखल्या जातो. मात्र या प्राण्याला मानवाकडून सम्मान दिला जात नाही. प्राणी जगतामध्ये याच प्राण्याच्या वाट्याला सर्वात मोठी उपेक्षा आली. पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार राज्यात २९ हजार १३२ गाढव आहेत. हा प्राणी पाळीव असला तरी त्याच्याकडून कामे करून मोकाट सोडल्या जाते. प्रामुख्याने भटक्या जमातींमध्ये हा प्राणी पाळल्या जातो. कष्टाची करण्यास हा प्राणी थकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या प्राण्यांच्या संवर्धनासाठी कागदोपत्री योजना आहेत. परंतु, प्रत्यक्षात अंमलबजावणीच होत नाही, असा भटक्या जमाती संघटनांचा आरोप आहे.गाढव या प्राण्याबाबत देशभरातील स्थिती जाणून घेण्यासाठी १० सप्टेंबर २०१७ ला दिल्ली येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत गाढवांची संख्या कमी होत असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे केंद्राने राज्य सरकारला यासंदर्भात दिली. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या आदेशानुसार पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डी.डी. फरकाडे यांनी कार्यवाही सुरू केली. यानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकाºयांना मागील आठवड्यात आदेश दिला. जिल्ह्यामध्ये गाढवांची संख्या किती याची माहिती सादर करण्याचे कळविण्यात आले. जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार पशुसंवर्धन विभाग ही माहिती गोळा करण्याचे काम हाती घेणार असल्याचे त्यामुळे जिल्ह्यात गाढवांची संख्या किती हे जाहीर होणार आहे.गाढव उपयुक्त प्राणीगाढवांचे अवयव आणि रक्ताचा वापर पशु खाद्यामध्ये केला जातो. शिवाय विविध आजारांवरील उपचाराकरिता गाढवांच्या रक्ताचा वापर होतो. त्यामुळे देशातील काही भागांमध्ये गाढवांच्या कत्तली होतात. हा प्राणी पाळीव असून मानवाला संरक्षण देण्यासाठी उपयुक्त आहे, अशी माहिती पशुसंवर्धन विभागातील अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी