आदर्श ग्राम घाटकुळचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले मूल्यांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:38 AM2019-08-09T00:38:51+5:302019-08-09T00:39:09+5:30

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानंतर्गत राज्यस्तरावर आदर्श गाव स्पर्धा राबवण्यात येत आहे. राज्यातील एक हजार गावांमध्ये मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तकांनी केलेल्या कामामुळे गावे विकासाच्या प्रवाहात आली.

District Collector assessed Adarsh Ghat Ghatkul | आदर्श ग्राम घाटकुळचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले मूल्यांकन

आदर्श ग्राम घाटकुळचे जिल्हाधिकाऱ्यांनी केले मूल्यांकन

Next
ठळक मुद्देगावकऱ्यांशी संवाद : ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानंतर्गत राज्यस्तरावर आदर्श गाव स्पर्धा राबवण्यात येत आहे. राज्यातील एक हजार गावांमध्ये मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तकांनी केलेल्या कामामुळे गावे विकासाच्या प्रवाहात आली. आदर्श गाव स्पर्धेत समावेश असलेल्या पोंभुर्णा तालुक्यातील घाटकूळ गावाची जिल्हास्तरीय तपासणी आज गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी केली व गावकºयांशी संवाद साधला.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान व शासकीय योजनांच्या समायोजनातून घाटकूळ गावाचा अल्पावधीतच कायापालट झाला आहे. जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, जिवतीचे गटविकास अधिकारी नारायण मिसाळ, पोंभुर्णा गटविकास अधिकारी धनंजय साळवे, व्हीएसटीएफ जिल्हा समन्वयक विद्या पाल, चंद्रशेखर गजभिये, टाटा ट्रस्टच्या मीनाक्षी अतकुलवार व डब्ल्यूसिटी प्रतिनिधी या जिल्हास्तरीय समितीने घाटकूळ गावाची पाहणी केली.
गावातील शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत आयएसओ नामांकित असल्याबाबत कौतुक केले. शोषखड्डे, शौचालय, घरकूल, बायोगॅस, पिण्याचे पाणी, बंदिस्त गटारे, लोकसहभाग, नाविन्यपूर्ण उपक्रम, श्रमदानातून झालेली कामे याची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केली. घाटकुळ येथे कार्यरत मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक अविनाश पोईनकर, ग्रामसेवक ममता बक्षी यांनी जिल्हाधिकाºयांना माहिती दिली. यावेळी पंचायत समिती उपसभापती विनोद देशमुख, सरपंच प्रिती निलेश मेदाळे, उपसरपंच गंगाधर गद्देकार, सदस्य अरुण मडावी, पत्रू पाल, प्रज्ञा देठे, सुनिता वाकुडकर, कुसुम देशमुख, कल्पना शिंदे आदी उपस्थित होते.

लोकसहभागातून गाव घडवा
जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमणार यांनी गावकºयांशी संवाद साधला. महिला बचत गटाने श्रमदानातून केलेला नाली उपसा व युवक मंडळाने विहिरीतील गाळ काढण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. गावात राबविलेल्या शासकीय योजनांचा आढावा घेतला. गावकºयांनी घरपट्टी, पाणीपट्टी शंभर टक्के भरुन ग्रामविकासात योगदान द्यावे. लोकसहभागातून आदर्श गाव घडवावा, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी गावकºयांना केले.

Web Title: District Collector assessed Adarsh Ghat Ghatkul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.