शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करणार कर्मचारी वेतनासाठी राज्य शासनाशी करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 14:51 IST

Chandrapur : शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आता याच बँकेतून

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्याने व लेखापरीक्षणातही अ श्रेणी मिळाल्याने राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन या बँकेतून देण्याचा निर्णय घेतला. यासाठी बँकेला एका महिन्याच्या आत शासनासोबत यासंदर्भात करार करणे बंधनकारक आहे, असे मंगळवारी (दि. १४) जारी केलेल्या निर्णयात नमूद केले आहे.

सन २०२५-२६ या वर्षाकरिता राज्यातील १५ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन व भत्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचे बँक खाते तसेच निवृत्तीवेतनधारकांचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. शासकीय निधीची सुरक्षितता विचारात घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम व नियमानुकूल व्यावसायिकता बाळगणाऱ्या तसेच इतर काही निकष पूर्ण करणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसंदर्भात सहकार, वस्त्रोद्योग व पणन विभागाकडून अभिप्राय घेण्यात आला आहे. सहकार, वस्त्रोद्योग व पणन विभागाने मागील पाच वर्षातील लेखापरीक्षण अहवाल अ वर्ग असणाऱ्या १५ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची शिफारस केली. त्यामध्ये चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचाही समावेश आहे. 

निधी गुंतवणुकीलाही मिळाली परवानगी २०२४-२५ या वर्षासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांचे बँक खाते व निवृत्तीवेतनधारकांचे वैयक्तिक बँक खाते उघडणे तसेच सार्वजनिक उपक्रम महामंडळांना त्यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीकरिता प्राधिकृत करण्यासही राज्य शासनाने मान्यता प्रदान केली आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर