शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
4
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
5
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
6
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
7
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
8
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
9
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
10
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
11
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
12
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
13
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
14
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
15
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
16
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
17
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
18
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
19
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
20
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप

माती आरोग्य पत्रिका वाटपात नागपूर विभागाची पिछाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 12:13 IST

पुणे, नाशिक, कोल्हापूर व औरंगाबाद विभागाने तब्बल २ लाख शेतकऱ्यांपर्यंत आरोग्य पत्रिका पोहोचवून आघाडी घेतली. त्यामुळे नागपूर विभागातील कृषी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा हलगर्जीपणाकेवळ ८९ हजार शेतकऱ्यांना लाभ

राजेश मडावीचंद्रपूर : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये जानेवारी महिन्यापर्यंत केवळ ८९ हजार जमीन आरोग्य पत्रिकांचे वाटप करण्यात आले. तर दुसरीकडे पुणे, नाशिक, कोल्हापूर व औरंगाबाद विभागाने तब्बल २ लाख शेतकऱ्यांपर्यंत आरोग्य पत्रिका पोहोचवून आघाडी घेतली. त्यामुळे नागपूर विभागातील कृषी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.जमिनीतील मूलद्रव्यांच्या आधारावर शेतकऱ्यांना खरीप व रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन करून संभाव्य संकटांवर मात करण्यासाठी जमिनीतील मातीचे नमुने तपासण्याची मोहीम कृषी विभागाकडून राज्यात एकाच दिवशी सुरू झाली. सिंचनाचा अभाव आणि पारंपरिक शेतीमुळे विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्यांतील कृषी उत्पादनात मोठी घट झाली. धान उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तर यंदा कमालीचा आर्थिक फ टका बसला असून आहे. या पार्श्वभूमीवर नवनवीन बियाणे आणि बदलते हवामान लक्षात घेवून मातीचे नमुने तपासून शेतकऱ्यांना आरोग्य पत्रिका देण्याची केंद्र सरकारच्या अभ्यासगटाची शिफारस महत्त्वपूर्ण मानली जात आहे.माती तपासणीअंती राज्यात राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत शेतकऱ्यांना माती आरोग्य पत्रिका वाटप केली जात आहे. परंतु, या अभियानाला पश्चिम महाराष्ट्रातील कृषी अधिकाऱ्यांनी अतिशय गांभिर्याने घेतले. परिणामी, पुणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद तसेच लातूर विभागाने डिसेंबर महिन्यातच २ लाख शेतकऱ्यांपर्यंत माती आरोग्य पत्रिका पोहोचवून आघाडी घेतली. तर नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत जानेवारीपर्यंत केवळ ८९ हजार शेतकऱ्यांपर्यत पत्रिका पोहोचल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नकारात्मक मानसिकतेमुळे या मोहिमेला बे्रक लागल्याचा आरोप जागरुक शेतकरी करीत आहेत.विभागनिहाय  माती आरोग्य पत्रिका वाटपपुणे                 ४ लाख २५ हजारनाशिक           २ लाख ५४ हजारकोल्हापूर        १ लाख ८७ हजारऔरंगाबाद         १ लाख ८४ हजारलातूर               १ लाख ५९ हजारअमरावती         ६३ हजारनागपूर             ८९ हजार

टॅग्स :agricultureशेती