शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
5
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
6
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
7
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
8
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
9
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
10
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
12
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
13
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
14
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
15
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
16
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
17
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
18
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
19
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
20
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'

२,८९८ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण करणार

By admin | Updated: June 26, 2017 00:43 IST

यावर्षीही श्रीगुरूजी फाऊंडेशनच्या वतीने भद्रावती व वरोरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

श्रीगुरूजी फ ाऊंडेशनचा उपक्रम : ३५ जिल्हा परिषद शाळांची निवडलोकमत न्यूज नेटवर्कआयुध निर्माणी (भद्रावती) : यावर्षीही श्रीगुरूजी फाऊंडेशनच्या वतीने भद्रावती व वरोरा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम २७ जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवसापासून सुरू होत आहे. त्याकरिता जिल्हा परिषदेच्या ३५ शाळांची निवड करण्यात आली असून या उपक्रमाचा लाभ दोन्ही तालुक्यातील २ हजार ८९८ विद्यार्थ्यांना होणार आहे.श्रीगुरूजी फ ाऊंडेशन ही एक सामाजिक नोंदणीकृत संस्था असून वेगवेगळे समाजपयोगी सामाजिक उपक्रम राबवित असते. ही संस्था प्रामुख्याने गरीब शालेय विद्यार्थी, जेष्ठ नागरिकांकरिता कार्य करते. उपक्रमामध्ये शालेय साहित्य वितरण, संस्थेद्वारा संचालित जनजागृती किर्तन, प्रवचनकार सत्संग मंडळाद्वारे किर्तन, प्रवचन, रामदेगी पदयात्रा, ग्रंथदिंडी असे कार्यक्रम घेण्यात येतात. मागील पाच वर्षांपासून रूग्णवाहिकेद्वारे अविरत रूग्णसेवा करीत आहे. सोबतच संस्थेकडे शीतशवपेटीची सुविधा उपलब्ध आहे.श्रीगुरूजी फाऊंडेशनच्या वतीने सलग नऊ वर्षांपासून शालेय साहित्य वितरणाचा कार्यक्रम अविरत सुरू आहे. एका शाळेपासून संस्थेने सुरूवात केली. यावर्षी भद्रावती व वरोरा तालुक्यातील ३५ जिल्हा परिषद प्राथमिक तसेच उच्च प्राथमिक शाळांमधील २ हजार ८९८ विद्यार्थ्यांना वर्गनिहाय विषयानुसार लागणारे नोटबुक, पेन्सिल, खोड रबर, शार्पनर, पेन आदी शालेयोपयोगी शालेय साहित्याचे वितरण करण्यात येणार आहे.हा कार्यक्रम यशस्वितेकरिता अध्यक्ष प्रशांत कारेकर, सचिव संजय तोगट्टीवार, राजेश्वर भलमे, पंकज कातोरे, संस्थेचे सर्व सदस्य तसेच भद्रावती प.स.सदस्य, अधिकारी वर्ग, कर्मचारी, जि.प. शाळेतील शिक्षक कर्मचारी वर्ग प्रयत्न करीत आहे. सहकार्यदाते आर्थिक तसेच शैक्षणिक साहित्य देवून सहकार्य करीत आहेत.निवडलेल्या शाळा व विद्यार्थीशाळेच्या पहिलया दिवसागणीक भद्रावती येथील जिल्हा परिषद शाळा गवराळा येथील २१०, विंजासन येथील १६३, शिवाजी नगर येथील ९५, सुरक्षा नगर येथील ४३, कन्या शळा गांधी चौक येथील ४८, नग परिषद जवळील मुलांची शळा येथील ३३, नेताजी नगर येथील ७७, घुटकाळा येथील १७२, चिचोर्डी येथील १३७, गौतम नगर येथील ३२, किल्ला वार्ड येथील ८७, सुमठाणा येथील १२२ विद्यार्थी तसेच भद्रावती ग्रामीणमधून खापरी येथील १४, केसुर्ली येथील १५, चालबर्डी येथील १२१, गुंजाळा येथील १२, कोची येथील २३, चिरादेवी येथील ६३, वारंगाव येथील ११, तेलवासा येथील १३, ढोरवासा येथील ६३, पिप्री येथील १०४, मुरसा येथील १२३, घोनाड येथील ६२, देऊरवाडा येथील ७८, कुनाडा येथील ५१, माजरी हिंदी शाळा येथील १९२ विद्यार्थ्यांना तसेच वरोरा तालुक्यातील बोर्डा येथील ४०, रामपूर येथील १३, राळेगांव मोठा शेगांव येथील ३९, टेंमुर्डा येथील ६८, माढळी येथील २११, सोईट येथील ४९, खांबाडा येथील १७३ विद्यार्थी असे भद्रावती व वरोरा तालुक्यातील ३५ जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरित करण्यात येणार आहे.