शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या मुदतबाह्य विधी प्रकरणांचा होणार निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 00:38 IST

जिल्हा परिषदमध्ये प्रलंबित असलेली मुदतबाह्य, निरूपयोगी व परिणामशून्य विधी प्रकरणे प्रशासनासाठी ठोकेदुखी ठरली. त्यामुळे अशा प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार जि.प. अंतर्गत एक समिती गठित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनवीन कार्यपद्धती जाहीर : विधी लेखा परीक्षणासाठी समिती गठित

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदमध्ये प्रलंबित असलेली मुदतबाह्य, निरूपयोगी व परिणामशून्य विधी प्रकरणे प्रशासनासाठी ठोकेदुखी ठरली. त्यामुळे अशा प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार जि.प. अंतर्गत एक समिती गठित करण्यात येणार आहे. यातून प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.जिल्हा परिषदमध्ये विविध विभागांची प्रकरणे न्यायालयात प्रविष्ठ आहेत. या प्रकरणाबाबत न्यायालयात सकारात्मक बाजू न मांडल्याने विनाकारण प्रलंबित आहेत. अशा प्रकरणांची प्रलंबितता कमी करणे. सर्व प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचे पुनर्विलोकन करणे आणि न्यायालयापुढे प्रलंबित असलेली मुद्दतबाह्य तसेच परिणामशून्य प्रकरणे निकाली काढण्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे दरवर्षी अशी प्रकरणे जिल्हा परिषदेत वाढतच आहेत. अशा प्रकरणाची माहिती घेऊन निपटारा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. परंतु, प्रशासनाला यश आले नाही. जि. प. च्या सर्वच विभागांमध्ये अशी प्रकरणे प्रलंबित आहेत. यावर प्रशासनाचा बराच वेळ खर्च होत आहे. मात्र या प्रकरणांचा अंतिम निपटारा होत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली. प्रकरणांशी संबंधित असलेल्या व्यक्ती यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रारी करू लागले. त्यामुळे ही प्रकरणे मार्गी लावणे, मुदतबाह्य प्रकरणे रद्द करण्यासाठी आता विधी समिती गठित होणार असून याद्वारे प्रलंबित प्रकरणांचा निपटारा केल्या जाणार आहे.कार्यकारी समितीची रचनाजिल्हा परिषदमध्ये प्रलंबित असलेली मुदतबाह्य, निरूपयोगी व परिणामशुन्य विधी प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी कार्यकारी समिती गठित होणार आहे. या समितीची रचना जाहीर झाली आहे. या समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. इतर सभासदांमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी, उपमुख्य कार्यकारी, सामान्य प्रशासन, उपमुख्य कार्यकारी पंचायत तसेच इतर अधिकारी राहणार आहेत. जिल्हा परिषदेतील नोंदणी शाखेतील प्राप्त झालेल्या सर्व न्यायालयीन प्रकरणांची व त्यावरील केलेल्या कार्यवाहीची सर्व माहिती संकलित करण्याची जबाबदारी नोडल अधिकाऱ्यांची राहणार आहे.कार्यकारी समितीची कक्षाही समिती जिल्हा परिषदेतील आव्हानित वाद, विषय, गट, क्षेत्र, कर्मचाºयांचा वर्ग, विवादाचा प्रकार, कालावधी, विभाग, मागासवर्ग, महिला, धोरणांबाबत न्यायालयीन विवादाची माहिती वर्गवारी करून आॅनलाईन पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे अशा प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी होणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद