शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

परवानगी न घेणारे मंडळ धर्मदायच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 6:00 AM

जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश तसेच इतर सार्वजनिक साजरा केला जातो. अनेकवेळा सामान्य नागरिकांकडून वर्गणी गोळा केली जाते. मात्र अनेकवेळा काही मंडळ धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची परवानगीच घेत नाही. गणेश उत्सव काही दिवसांवर आला आहे.

ठळक मुद्देकेवळ ३८ मंडळांनी घेतली परवानगी : अनेक मंडळांकडून वर्गणी गोळा करणे सुरु

साईनाथ कुचनकार ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर आला आहे. त्यामुळे गल्लीबोळातील लहान मोठ्या मंडळांनी पावती बुक छापून लाखो रुपयांची वर्गणी गोळा करणे सुरू केले आहे. मात्र हे करताना धर्मदाय आयुक्त कार्यालयाची परवानगी घेणे काही सार्वजनिक मंडळे विसरली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील सदर मंडळ धर्मदाय आयुक्त कार्र्यालयाच्या रडारवर असून त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेश मंडळ असतानाही आतापर्यंत केवळ ३८ मंडळांनीच वर्गणी गोळा करण्यासंदर्भात धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून परवानगी घेतली आहे. वर्गणी देण्यापूर्वी सार्वजनिक मंडळांच्या सदस्यांना परवागी संदर्भात विचारणा करूनच वर्गणी देणे गरजेचे आहे. आपण दिलेली वर्गणी योग्य कामासाठी वापरली जाते की, अन्य कामाला. हे सुद्धा बघणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी जागरुक राहून आपले कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे.हिशेब देण्यास टाळाटाळजिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गणेश तसेच इतर सार्वजनिक साजरा केला जातो. अनेकवेळा सामान्य नागरिकांकडून वर्गणी गोळा केली जाते. मात्र अनेकवेळा काही मंडळ धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची परवानगीच घेत नाही. गणेश उत्सव काही दिवसांवर आला आहे. मंडळांनी मोठ्या प्रमाणात पावती बुक छापून वर्गणी गोळा करणे सुरू केले आहे. एखाद्याने परवानगी तसेच हिशेबाचा विषय काढलाच तर वार्डातील काम आहे, उत्सवानंतर हिशेब दिल्या जाईल, असे उत्तर देऊन मंडळाचे सदस्य वेळ मारून नेत आहेत. काही गणेश मंडळाचे सदस्य हिशेब मागणाऱ्यांकडे जाण्याचे कटाक्षाने टाळत आहे.तक्रार केल्यास होणार कारवाईएखाद्या मंडळाने गोळा केलेल्या रकमेचा अपहार केला किंवा हिशेब देत नसेल, मंडळाच्या उद्देशालाच जर हरताळ फासला जात असेल तर मंडळावर कारवाई केली जाऊ शकते. मात्र यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार करणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० च्या कलम ६६ (क)प्रमाणे तीन महिन्यांची कैद किंवा परवागीशिवाय गोळा केलेल्या रकमेच्या एकूण वर्गणीच्या दीडपट दंड संबंधित मंडळाकडून आकारण्यात येणार आहे.अशी घ्या परवानगीवॉर्डात किंवा गावात सार्वजनिक गणेशोत्सव तथा इतर उत्सव साजरा करायचा असेल तर धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून वर्गणी गोळा करण्याची परवानगी घेणे आवश्यक आहे . यासाठी सात किंवा त्यापेक्षा अधिक सदस्यांनी मिळून ठराव घेणे गरजेचे आहे. या सदस्यांचे ओळखपत्र, आधारकार्ड, ज्या जागेवर स्थापना करावयाची आहे, त्या जागा मालकांची परवानगी पत्र, वीज मंडळाचे नाहरकत पत्र, किंवा छोट्या मंडळांसाठी ज्या घरमालकांकडून वीज घेण्यात आली आहे. त्यांचे नाहरकत प्रमाणपत्र, वीजबिल आदी कागदपत्र गोळा करून, १०० रुपयांच्या स्टँपपेपरवर उत्सवासंदर्भात उद्देश लिहावा. त्यानंतर धर्मदाय आयुक्त कार्यालयामधून पाच रुपयांचा अर्ज घेऊन या अर्जातील माहिती भरून आॅफलाईन किंवा आॅनलाईन अर्ज सादर केल्यास १५ दिवसांत परवानगी मिळेल.ऑनलाईन, ऑफलाईन अर्ज भरण्याची सुुविधाधर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून देणगी गोळा करण्यासाठी परवानगी मिळविण्यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज भरता येतो. अर्ज सादर केल्यानंतर किमान १० ते १५ दिवसांमध्ये मंडळांना परवानगी मिळतात.दान-देणगीसाठीच परवानगीधर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून कोणताही उत्सव साजरा करण्यासाठी नाही तर दान-देणगी गोळा करण्याची परवानगी दिल्या जाते. त्यामुळे केवळ या कार्यालयाकडून परवानगी मिळाली म्हणजे, सार्वजनिक उत्सव साजरा करू शकतो, असा गैरसमज मंडळांनी दूर करणे गरजेचे आहे.सार्वजनिक मंडळांची जबाबदारीसार्वजनिक मंडळाने उत्सवादरम्यान धर्मदाय आयुक्त कार्यालयाची परवानगी घेतल्यानंतर त्या परवानगीची माहिती दर्शनी भागात लावणे गरजेचे आहे. मात्र अनेक गणेश मंडळ याकडे दुर्लक्ष करतात.जनजागृतीसाठी पोलीस अधीक्षकांचे पत्रजिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. मात्र काही मंडळ कोणतीही परवानही न घेता उत्सव साजरा करतात. अनेकवेळा मोठ्या प्रमाणात वर्गणीसुद्धा गोळा करताता. त्यामुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करावा, असे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयाला दिले आहे.पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही मंडळाने वर्गणी गोळा करू नये. काही मंडळांना भेटी देण्यात येणार असून यामध्ये गैरप्रकार आढळल्यास तत्काळ कारवाई केली जाईल.- सी. एम. ढबालेसहाय्यक धर्मदाय आयुक्त,चंद्रपूरदोन महिन्यांत द्यावा लागेल हिशेबसार्वजनिक मंडळांनी धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून वर्गणी गोळा करण्यासंदभात परवानगी घेतल्यानंतर या कार्यालयाला दोन महिन्यांच्या आत लेखा परीक्षण अहवाल सादर करावा लागणार आहे. तसेच उत्सवानंतर शिल्लक राहिलेली रक्कम जमा करणे अनिवार्य आहे.परवानगी घेण्यासाठी अत्यल्प प्रतिसादमागील वर्षी गणेश तसेच शारदोत्सवामध्ये जिल्ह्यात तब्बल बाराशेंच्यावर मंडळांनी वर्गणी गोळा करण्यासाठी परवागी घेतली होती. यावर्षी मात्र अल्प प्रतिसाद असून केवळ ३८ अर्जच कार्यालयाकडे प्राप्त झाले आहे. यामध्ये ३० ऑनलाईन आणि ८ ऑफलाईन अर्ज करण्यात आले.परवानगी केवळ सहा महिन्यांसाठीउत्सावासाठी गोळा करण्यात येणाºया वर्गणीसाठी ४१(क) अंतर्गत तात्पुती परवानगी देण्यात येत असून ही परवानगी सहा महिन्यांच्या कालावधीची राहते. सहा महिन्यानंतर ही परवानगी वैद्य राहात नाही. एवढेच नाही तर परवानगी घेतल्यानंतर नुतनीकरणही होत नाही.पूरग्रस्तांना करावी मदतयावर्षी सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये महापूर आला. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवीत तसेच आर्थिक नुकसान झाले. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. या पूरग्रस्तांना सावरण्यासाठी सर्वस्तरावरून मदत पाठविली जात आहे. सार्वजनिक मंडळांनीही जबाबदारी स्वीकारून उत्सव साजरा करण्यापेक्षा सामाजिक बांधिलकी म्हणून पूरग्रस्तांना मदत केल्यास खºया अर्थाने सार्वजनिक मंडळाचे काम सर्वसामान्यांपर्यंत पोहचेल.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव