शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवलक्ष्मी पतसंस्थेच्या संचालकांवर कोट्यवधींची फसवणूक केल्याचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 19:39 IST

गुंतवणूकदारांनी केली तक्रार : फसवणूक झालेल्यांनी संपर्क साधावा, पोलिसांनी केले आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वरोरा तालुक्यातील शेगाव (बु) येथील शिवलक्ष्मी महिला नागरी सहकारी पत निधी लिमिटेड या संस्थेने अधिक व्याजदर, दामदुप्पट परतावा आणि तत्काळ कर्ज अशा अनेक आमिषांनी नागरिकांची १ कोटी २ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुंतवणूकदारांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्यांनी आर्थिक गुन्हे शाखा, पोलिस अधीक्षक कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

गुन्हा दाखलयाप्रकरणी पोलिस ठाणे शेगाव (बु.) येथे भारतीय न्याय संहिता ३१८ (४), ३१६ (२), ३१६ (५), ३ (५) सहकलम ३ एमपीआयडी अॅक्ट १९९९ अन्वये गुन्हा नोंद असून तपास आर्थिक गुन्हे शाखा चंद्रपूर करीत आहे. 

अशी आहे गुन्ह्याची पार्श्वभूमीशेगाव (बु.) येथील अब्दुल रहेमान शेख इस्माईल यांनी दिलेल्या तक्रारीवरून, मनोज खोंडे, सुभाष चाफले, श्रीकांत घाटे या संचालकांनी एजंट आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गुंतवणुकीसाठी लोकांना आकर्षित केले. त्यांनी नागरिकांना लखपती योजना, पिकनिक कर्ज, बचत गट कर्ज, दुप्पट परतावा आदी आश्वासने देत गुंतवणूक करून घेतली. मात्र नियोजित परतावा दिला नाही. परिणामी गुंतवणूकदार आर्थिक अडचणीत आले आहेत.

फसवणूक झालेल्यांनी संपर्क करागुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचे प्रमाणपत्र, रक्कम भरल्याची पावती, आधार कार्ड व पॅन कार्ड, बँक पासबुक (राष्ट्रीयीकृत बँक खाते) ची झेरॉक्स, शासनाच्या परिपत्रकानुसार परिशिष्ट-१ नमुन्यातील भरलेला फॉर्म, आर्थिक गुन्हे शाखा, पोलिस अधीक्षक कार्यालय, दुर्गापूर येथे संपर्क पोलिस अधीक्षक का साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर