शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांची भूक भागविणारे शिवभोजन केंद्र संचालक उपाशी ! आठ महिन्यांपासून अनुदान थकीत

By परिमल डोहणे | Updated: April 2, 2025 14:27 IST

आठ महिन्यांपासून अनुदान थकीत : उपासमारीची वेळ

परिमल डोहणेचंद्रपूर : सर्वसामान्य व गरजूंना केवळ दहा रुपयात जेवण देऊन भूक भागविणाऱ्या शिवभोजन केंद्राच्या संचालकांचे मागील आठ महिन्यांचे अनुदान थकीत आहे. परिणामी स्वत:च्या कुटुंबासह गरजूंची भूक भागवायची कशी, असा प्रश्न केंद्र संचालकांना पडला आहे.

गरजूंची भूक भागविता यावी, यासाठी तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने संपूर्ण राज्यात शिवभोजन केंद्राची योजना सुरू केली. या योजनेंतर्गत गरजूंना केवळ दहा रुपयात भोजन देण्याची तरतूद आहे. जिल्ह्यात शहरी व ग्रामीण मिळून ४८ शिवभोजन केंद्र आहेत. शहरी भागातील केंद्राला शासनाकडून एका थाळीवर ४० रुपये अनुदान, तर ग्राहकांकडून दहा रुपये, तर ग्रामीण भागातील केंद्राला शासनाकडून एका थाळीवर २५ रुपये अनुदान, तर ग्राहकांकडून दहा रुपये घ्यायचे असतात. मात्र, मागील ऑगस्ट २०२४ पासून मार्च २०२५ पर्यंतचे तब्बल आठ महिन्यांचे अनुदान थकीत आहे. काही तालुक्यातील शिवभोजन केंद्र संचालकांचे सहा महिन्यांचे अनुदान थकीत आहेत. अनेकदा थकीत अनुदान देण्याची मागणी केंद्र संचालकांकडून करण्यात आली. मात्र, अद्याप त्यांना अनुदान देण्यात आलेले नाही. परिणामी केंद्र संचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 

किराण्याची उधारी थकलीमागील आठ महिन्यांपासून अनुदान रखडल्याने केंद्र संचालक किराणा साहित्याची उधारीवर खरेदी करत आहेत. आठ महिन्यांपासून उधारी देत नसल्याने किराणा व्यावसायिकांनी केंद्र संचालकांना उधारी देणेच बंद केले आहे. त्यामुळे आता कुठून साहित्य आणायचे आणि गरजूंची भूक भागवायची? असा प्रश्न केंद्र संचालकांना पडला आहे.तुटपुंजा अनुदानावर भागवतात भूक

शहरांसाठी एका थाळीमागे शासन ४० रुपये अनुदान देते. १० रुपये लाभार्थ्यांकडून घेतले जातात, तर ग्रामीण भागात २५ रुपये अनुदान, तर ग्राहकांकडून १० रुपये घेतले जातात. या अनुदानातून अनुदानातून शिवभोजन शिवभोज केंद्र चालविले जातात. शिवभोजन केंद्रांवरून १० रुपयांत लोकांना हे भोजन मिळते. केवळ ३५ रुपयांत वरण-भात, चवदार भाजी आणि दोन चपात्या देणे वाढत्या महागाईत शिवभोजन केंद्र संचालकांना परवडत नाही. 

दररोज बदलतो मेनूशिवभोजन केंद्रात गरजुंसाठी अन्न शिजविले जात असले तरी दररोजचा मेनू बदलता ठेवला जातो. हंगामानुसार मेनूमध्ये विविध पदार्थांचा समावेश केंद्र संचालकांकडून केला जातो. सण, उत्सवात गोड पदार्थही दिले जातात.

अधिकारी म्हणतात बिले टाकली

अनुदानाबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या केंद्रसंचालकांनी अधिकारी बिले टाकण्यात आली आहेत, लवकरच अनुदान येईल, असे सांगून वेळ मारुन नेत असल्याचा आरोपही केंद्रसंचालकांनी केला आहे. 

संचालक म्हणतात"आठ महिन्यांपासून अनुदानच नाही, त्यातच वाढलेली महागाई आणि शासनाकडून मिळणारे तुटपुंजे अनुदान यात भागवायचे कसे, असा प्रश्न आहे. शासनाने त्वरित अनुदान द्यावे."

- केंद्रसंचालक

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर