शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कांदा लागवडीतून ’गुणवंत’ला मिळाली दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:47 IST

मनात यशाची जिद्द व तळमळ असली तर अनेक अडचणींवर मात करून प्रगतीच्या संधी निर्माण करता येतात. नोकरीच्या शोधात आयुष्य घालवून निराश होण्यापेक्षा आपली शेती बरी हा विचार करणारे युवक कमीच आहेत.

ठळक मुद्देबेरोजगारांना प्रेरणा : आष्टा येथील युवकाने दिला पारंपरिक शेतीला फ ाटा

विराज मुरकुटे ।लोकमत न्यूज नेटवर्कपोंभुर्णा : मनात यशाची जिद्द व तळमळ असली तर अनेक अडचणींवर मात करून प्रगतीच्या संधी निर्माण करता येतात. नोकरीच्या शोधात आयुष्य घालवून निराश होण्यापेक्षा आपली शेती बरी हा विचार करणारे युवक कमीच आहेत. मात्र, आष्टा गावातील गुणवंत भालचंद्र या उच्च शिक्षित युवकाने पारंपरिक शेती टाळून कांदा लागवडीचा मार्ग स्वीकारला.गुणवंत भालचंद्र मोरे यांनी शेती व्यवसायालाच केंद्रबिंदू मानले. गुणवंतला चक पोंभुर्णा शिवारात पाच एकर शेती आहे. यापैकी केवळ अर्धा एकरात महाबिजकडून ‘किरण’ नावाचे कांदा बियाणे लागवड करून नवा मार्ग स्वीकारला. रासायनिक खताचा वापर न करता केवळ सेंद्रिय बॉयोडॉयनॉमिक खताचा वापर केला. हा कांदा लाल रंगाचा असून पीक मोठ्या डौलाने उभे आहे. कांद्याची शेती ते चार वर्षांपासून करीत आहेत. त्यासोबतच भेंडी, धान, हरभरा, कोंथीबीर व भाजीपाला पिकांचे ेउत्पादनही घेत आहे. त्यांना कुटुंबियाचीही मदत आहे.शासनाकडून सिंचनाची योजना नसताना केवळ शेतातीलच छोट्याशा विहिरीतूनच पाणी दिले जात आहे. त्यांनी तुषार सिंचन लावला असून दरवर्षी समाधानकारक पीक हाती येत आहे. अर्ध्या एकरात दरवर्षी ४० क्विंटल कांद्याचे उत्पादन होत आहे. आतापर्यंत ८० हजार किंमतीचे उत्पन्न गुणवंतला मिळाले आहे. सहा ते सात हजारांचा खर्च वजा केल्यास ७३ हजारांचा नफा मिळाला, अशी माहिती गुणवंतने दिली.कांदा लागवडीसाठी कृषी कार्यालय पोंभुर्णा येथून बियाणे मिळविले. यासाठी कृषी सहायक ए. डी. ताले यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे. कांदा उत्पादन निघाल्यानंतर पोंभुर्णा येथील बाजारपेठ व सोबतच जिल्ह्यातील तालुका बाजारातही लाल कांद्याची विक्री केली जात आहे. कांदा लागवडीची ही शेती अन्य शेतकऱ्यांनाही प्रेरणादायी आहे.केवळ पारंपरिक पीक न घेता बदलत्या काळानुसार शेती केल्यास अडचणीवर मात करता येवू शकते. त्यासाठी मानसिकतेमध्ये बदल करावा. शासनाच्या योजनांचाही लाभ घ्यावा, अशी प्रतिक्रि या गुणवंतने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.बॉयोडायनॅमिक खत म्हणजे काय?पीक काढल्यानंतर शेतात तणस लाखोळीचे कुटार, गव्हांडा, घसकट व शेतातून निघालेला काडीकचरा एकत्र कुजविल्यास बॉयोडायनॅमिक सेंद्रिय खत तयार होते.

टॅग्स :onionकांदा