शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
2
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
3
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
4
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
6
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
7
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
8
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
9
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
10
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
11
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
12
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
13
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
14
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
15
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
16
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
17
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
18
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
19
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
20
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल पेमेंटमुळे राहतोय लहान व्यावसायिकांचा 'गल्ला' रिकामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 19:01 IST

Chandrapur : ग्रामीण भागातही कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही वर्षांमध्ये डिजिटल पेमेंट करण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. शहरांसह ग्रामीण भागातील बाजारपेठेत हा व्यवहार वाढला आहे. यामुळे व्यवहार करणे सोपे झाले, तरी किरकोळ विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना फायद्यापेक्षा डोक्यावर हात मारण्याची परिस्थिती निर्माण होत आहे. अनेकवेळा गल्ल्यामध्ये पैसाच दिसत नसल्याची वेळही त्यांच्यावर येत आहे.

खिशात पैसे न ठेवता मोबाइल खिशात असला की निर्धास्तपणे नागरिक वावरू लागले आहेत. मॉर्निंग वॉकपासून अगदी रात्री उशिरापर्यंत कुठेही पैशाचे काम पडले की, मोबाइल बाहेर काढला जातो. ग्रामीण भागात अनेक हायटेक बदलांना सुरुवात झाली आहे. मात्र डिजिटल पेमेंट करताना काळजी घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.

ऑनलाइन क्यूआर कोडची शहरासह ग्रामीण भागातही चलती■ शासकीय योजनांचा लाभ असो की, शालेय शिक्षण, आरोग्य व्यवस्था अथवा बाजारातील जीवनावश्यक वस्तूंची खरेदी, आता सगळीकडे कॅशलेस व्यवहाराला अधिक पसंती दिली जाते. त्यामुळे ग्रामीण भागातही ऑनलाइन क्यूआर कोडची चलती आहे. आता शहरी भागातील डिजिटल रुपया ग्रामीण भागातही चांगलाच स्थिरावला आहे.■ पैसे खिशात ठेवून दुकानात जाण्याची मुळीच गरज नाही. अगदी दुधवाला, भाजीवाला असो लहान-मोठ्या दुकानदारांकडेही क्यूआर कोड उपलब्ध आहे. गत काही वर्षात ऑनलाइन व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पूर्वीच्या तुलनेत सध्या ऑनलाइन व्यवहारावरच सर्वाधिक भर दिला जात आहे. त्यामुळे सध्या रोखीचे व्यवहार कमी झाले आहेत.■ संसारोपयोगी साहित्य, खाद्यपदार्थ, भाजीपाला, फेरीवाल्यांकडील खाऊ घ्यायचा असला तरी क्यूआर कोड स्कॅन केला जात आहे. रोखीने होणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण कमी झाले आहे. आता खिशात नव्हे, तर बँकेच्या खात्यात पैसा असायला हवा, अशी अवस्था निर्माण झाली आहे.■ सुरुवातीच्या काळात प्रशासकीय पातळीवरून जनजागृती करण्यात आली. नागरिकांनाही त्याचे महत्त्व पटले असून, सध्या रोखीच्या व्यवहारांचे प्रमाण पटल्याने डिजिटल पेमेंटला प्राधान्य दिले जात आहे.

खबरदारी घ्या...ऑनलाइन व्यवहारामुळे गरज पूर्ण होऊ लागली आहे; परंतु यामुळे किरकोळ व्यावसायिकांचा गल्ला रिकामा, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करत असताना पुरेपूर खबरदारी बाळगायला हवी, असे आवाहन पोलिस प्रशासन व बँकांद्वारे केले जात आहे. ज्या विक्रेत्यांकडे ऑनलाइन सुविधा नाही, त्यांची पंचायत होते. तर ज्यांचे व्यवहार बँकेत असतात, त्या विक्रेत्यांना लहानसहान व्यवहारामुळे बँक स्टेटमेंटची पाने वाढतात. कधी स्टेटमेंटची गरज भासल्यास पैसे मोजावे लागतात. 

टॅग्स :Paytmपे-टीएमSmall Businessesलघु उद्योगchandrapur-acचंद्रपूर