शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

अकरावीच्या विद्यार्थ्यांची अडचण वाढली; बायोमेट्रिक अनिवार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 14:07 IST

Chandrapur : अकरावी व बारावी कॅश क्रोर्सच्या नावाखाली सर्वत्र मोठमोठ्या इन्स्टिट्यूट निर्माण झाल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती वाढवणे, शिष्यवृत्ती, सवलतींसाठी पारदर्शकता आणणे, या उद्देशाने शिक्षण विभागाने राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी वर्गासाठी बायोमेट्रिक (आधार आधारित) हजेरी प्रणाली सक्तीची केली आहे. मात्र, बहुतांश विद्यार्थी मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवणी लावून एखाद्या छोट्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतात. अशा विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी चांगलीच अडचणीची जाणार आहे. यामुळे इन्स्टिट्यूट संचालक तसेच विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

अकरावी व बारावी क्रॅश क्रोर्सच्या नावाखाली सर्वत्र मोठमोठ्या इन्स्टिट्यूट निर्माण झाल्या आहेत. येथे प्रवेश घेतल्यानंतर ते छोट्या-मोठ्या कॉलेजमध्ये त्या विद्यार्थ्यांचा प्रवेश दाखतात. परंतु, आता बायोमेट्रिक हजेरीत हे शक्य नाही. त्यामुळे अडचण वाढणार आहे.

अकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी राबवणार?यंदाच्या शैक्षणिक सत्रात अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली आहे. त्यासाठी पोर्टलवर विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू झाली आहे. येथे ऑनलाइन कागदपत्रे अपलोड करावयाचे आहेत.

महाविद्यालयात नाही यंत्रणाअनेक महाविद्यालयांमध्ये यंत्रणा अजूनही पूर्णपणे कार्यरत नाही. यासोबतच मशीन बंद असणे, अंगठा न ओळखला जाणे, कनेक्टिव्हिटी समस्या, सकाळी उशीर झाल्यास विद्यार्थ्यांची हजेरी लागत नाही आणि अनुपस्थिती नोंदवली जाते. अशाही अनेक अडचणी निर्माण होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे शिक्षण संचालकांमध्येही अडचण निर्माण झाली आहे. तांत्रिक समस्यांही कायम आहे.

जिल्ह्यात अकरावीच्या २० हजार जागाचंद्रपूर जिल्ह्यात अकरावी प्रवेशाच्या जवळपास २० हजार जागा आहेत. दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या २४ हजार २५ इतकी आहे. यातील काहीजण वेगवेगळ्या शाखा निवडतात.

थम्ब अटेन्डन्स नसल्यास मिळणार नाही योजनांचा लाभविद्यार्थ्यांची हजेरी वाढविण्याच्या अनुषंगाने तसेच पात्र विद्यार्थ्याला शैक्षणिक योजनेचा लाभ देण्याच्या अनुषंगाने थम्ब अटेन्डन्स बंधनकारक केले आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर