शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्थेच्या कर्जावरील व्याजात तफावत

By admin | Updated: June 7, 2015 01:09 IST

थील शासकीय निमशासकीय सेवकाची पतसंस्थेच्या चौकशीचा अहवाल चौकशी समिती प्रमुख पी.एच.बेग आणि सहकार अधिकारी आर.डी. कुमरे यांनी नुकताच सादर केला.

अफरातफर निश्चितीचे आदेश : चौकशी समितीने सादर केला अहवालबी.यु. बोर्डेवार राजुरायेथील शासकीय निमशासकीय सेवकाची पतसंस्थेच्या चौकशीचा अहवाल चौकशी समिती प्रमुख पी.एच.बेग आणि सहकार अधिकारी आर.डी. कुमरे यांनी नुकताच सादर केला. या पतसंस्थेने वार्षिक अहवालात परस्पर रकमा बदलून चुकीच्या पद्धतीने ताळेबंद व नफातोटा पत्रक बनवून सभासदांची व शासनाची दिशाभूल करीत असल्याचे चौकशी अहवालात नमूद केले आहे. या पतसंस्थेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. यामध्ये सभासद कर्जावरील व्याजामध्ये तब्बल ९३ लाख ३६ हजार ५१२ रुपयांची तफावत असल्याचे नमूद आहे.राजुरा येथील शासकीय निमशासकीय सेवकाची पतसंस्था राजुरा यांच्या २०१३-२०१४ च्या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या अनेक त्रुट्या चौकशीमध्ये आढळून आल्या आहे. २०१२-१३ मधील निवडणूक खर्च २५ हजार रुपये अहवालातून गायब करण्यात आली. जमाखर्चाचे आकडे नफा-तोटा खात्यात घेताना तफावत दिसून येत आहे. या तफावतीच्या रकमेमध्ये स्टेशनरी व छपाई खर्चामध्ये १४ हजार ५२४ तफावत आहे. हार्डवेअर व साफ्टवेअर मेंटनन्स खर्चात ५५ हजारांची तफावत आहे. कार्यालय भाड्यात १० हजार ९५० ची तफावत आहे. सभासद कर्जावरील व्याजात ९३ लाख ३६ हजार ५१२ ची तफावत आहे तर लेखा परीक्षण शुल्कात २३ हजार ४७१ रुपयांची तरतूद आहे. २०११-१२ च्या आर्थिक पत्रकात अफरातफरीची नोंद घेतली. परंतु २०१२-१३ च्या आर्थिक पत्रकामध्ये अफरातफरीची नोंद घेतलेली नाही. बँक सेव्हींग खाते व बँक कॅश क्रेडीट खाते यांच्या रक्कमा जुळत नाही. शासकीय अर्धशासकीय सेवकाच्या पतसंस्थेच्या नफ्यात २२ लाख १७ हजार १३६ रुपयांचा फरक दिसून येत आहे. ताळेबंद पत्रकानुसार देयता बाजूस २७ लाखांचा फरक दिसून येत आहे. २०१३-१४ च्या ताळेबंदात अनेक बाबींमध्ये फरक दिसत आहे. बुडीत कर्ज निधी दोन लाख, झीज फंड दोन लाख ५५ हजार ९४५, कल्याण निधी २५ हजार, चढउतार निधी पाच हजार, कर्मचारी उपदान ५० हजार, नफा चार लाख ६० हजार ३९५, डेडस्टॉक एक लाख ६३ हजार १५०, लाभांश अग्रीम ५० हजार रुपये अशी नोंद आहे. २०१३-१४ चे फेर लेखा परीक्षण होणे आवश्यक असल्याचे अहवालात म्हटले आहे. अफरातफर रकमेची महाराष्ट्र सरकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८५/८८ अन्वये जबाबदारी निश्चित करून रितसर कारवाई आवश्यक असल्याचेही अहवालात पी.एस. बेग, आर.डी. कुमरे यांनी म्हटले आहे.