खडसंगी: कमी अंतरावर शाळा असल्याने एका विद्यार्थ्यांचे दोन शाळेत नाव असून शासनाची लुट सुरू असल्याचे शिक्षण विभागाचे लक्षात आले आहे. राज्यात पाचवी आणि आठवीचे या सत्रापासून अंदाजे १८00 नवीन वर्ग सुरू करण्यात येणार आहे. कमी अंतरावरच वर्गाना मान्यता मिळाली तरी भ्रष्टाचार होण्याची अधिक शक्यता असते. म्हणून शासन आता लेखी नोंदीऐवजी राज्यात पाचवीचे अंदाजे १५८८ तर आठवीचे २६0 ठिकाणी वर्ग सुरू करण्यात येणार आहे. पुर्वी दोन शाळात जास्त अंतर दाखवून एकाच विद्यार्थ्यांच्या नावावर शासनाच्या विविध योजनेचा पैसा व्यवस्थापनाकडून लाटला जात होता. प्रत्यक्ष मुलांची संख्या कमी असूनही कागदावर पटसंख्या ही मोठय़ा प्रमाणात दाखविण्यात येत होती. सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्यासाठी २00९ साली शिक्षणाचा कायदा अंमलात आणला. त्याची अंमलबजावणी करण्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे. शिक्षणाच्या कायद्यानुसार या सत्रापासून आता चौथीला पाचवीचे तर सातवीला आठवीचे वर्ग जोडण्यात येणार आहेत. या कायद्यानुसार पहिली ते पाचवी असा पुर्व प्राथमिक तर सहावी ते आठवी असा प्राथमिक असे दोन टप्पे करण्यात आले आहेत. त्यानुसार पाचवी आणि आठवीचे वर्ग सुरू करण्यात येणार असल्याने शाळामधील अंतर हे काटेकोटरपणे नोंदविण्यासाठी लेखी नोंदीसह गुगल मॅपींगद्वारेही शाळांचे अंतर तपासण्यात येणार आहे. प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी शाळेमध्ये जाऊन आपल्या अँन्ड्रॉईड मोबाईलमध्ये शाळेचे नाव, ठिकाण, यु- डायस कोड नंबर याची माहिती सर्च करून नोंदणी करीत आहेत. त्यामुळे व्यवस्थापनाने शाळेच्या अंतराबाबत चुकीच्या नोंदी दर्शविल्या तरी या गुगल मॅपींगमुळे शासनास शाळेचे अंतर अचुक कळण्यास मदत होणार आहे.याशिवाय बोगस पटसंख्येवरही आळा बसणार आहे. (वार्ताहर)
‘गुगल मॅपिंग’ द्वारे मोजणार दोन शाळेतील अंतर
By admin | Updated: May 29, 2014 02:08 IST