शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सोनाई कंपनीविरोधात धनगर समाजाचा ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 15:14 IST

Chandrapur : पाऊण महिना लोटूनही शेळ्यांच्या मृत्यूची दिली नाही नुकसानभरपाई

लोकमत न्यूज नेटवर्क सावरगाव : नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील सोनाई प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून कंपनीच्या समोरील आवारात १४ जून रोजी फेकण्यात आलेले विषारी टाकाऊ खाद्यपदार्थ खाल्ल्याने तेथे चरत असलेल्या हरिचंद्र जिगरवार यांच्या आठ शेळ्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, मोबदला देण्याचे कंपनीने कबूल केले होते. मात्र, जवळपास पाऊण महिना लोटूनही मोबदला मिळाला नसल्याने ४ जुलै रोजी सदर कंपनीसमोरच वाढोणा येथील धनगर (कुरमार) समाजबांधवांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

तालुक्यातील वाढोणा परिसरात कामे सुरू असल्याने वाढोणा येथे सोनाई प्रा. लि. कंपनी उभारण्यात आली आहे. या कंपनीसमोर भरपूर खुला परिसर आहे. कंपनीच्या आवाराबाहेरील बाजूत कंपनीच्या लोकांनी जीवितहानी घडवणारे टाकाऊ पदार्थ फेकून दिले होते. त्या ठिकाणी धनगर समाजाच्या शेळ्या-मेंढ्या चरत असताना तेथील पदार्थ खाल्ल्याने हरिचंद्र जिगरवार यांच्या आठ शेळ्या मृत पावल्या. तर काही शेळ्या आजारी पडल्या. कंपनीने शेळीमालक हरिचंद्र जिगरवार यांना मोबदला देण्याचे कबूल केले. परंतु, पाऊण महिना लोटूनही आतापर्यंत कुठलीच नुकसानभरपाई दिली नाही. म्हणून धनगर समाज व गावकऱ्यांनी सोनाई कंपनीसमोरच गुरुवारी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

आंदोलनामध्ये यांचा सहभागया आंदोलनामध्ये नागभीड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष कृष्णा गंजेवार यांच्या नेतृत्वात नागोजी चौडेवार, धनगर समाजप्रमुख युवराज डेकरवार, हरिचंद्र जिंगरवार, रवींद्र येगेवार, बाबुराव ओगुवार, गुवार, रमेश कोमावार, विनायक बुडमेवार, बाबुराव नसकु- लवार, लक्ष्मण ओगुवार, गणेश उईनवार, आनंदराव नस्कुलवार, चक्रधर झोडे, लीलाधर सोनवाणे, स्वप्निल आंबोरकर, एकनाथ जिगरवार, दौलत पोतरजवार, पुरुषोत्तम बुडमेवार, मयूर परसवार, मनोज कंकलवार, बंडू उईनवार, मंगेश अन्नाचार, युवराज उईनवार, भास्कर देवेवार आदींचा सहभाग होता.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर