शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यात धामधूम, नागभीडमध्ये सामसूम

By admin | Updated: July 7, 2015 01:03 IST

गेल्या काही दिवसांपासून नागभीड तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची धामधुम सुरु असली तरी नागभीडमध्ये मात्र सामसूम आहे

राजकीय नेत्यांमध्ये संभ्रम : नागभीडला नगरपंचायत, नगरपालिका की ग्रामपंचायत ?नागभीड: गेल्या काही दिवसांपासून नागभीड तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची धामधुम सुरु असली तरी नागभीडमध्ये मात्र सामसूम आहे. नागभीडमध्ये निवडणूक आहे की नाही अशी संभ्रमावस्था या वातावरणामुळे निर्माण झाली आहे.निवडणूक ही लोकशाहीचा उत्सव असते, असे म्हणतात. आणि म्हणूनच निवडणूक म्हटले की या लोकशाहीचे पाईक खडबडून जागे होतात. गेल्या अनेक निवडणुकींचा अनुभव लक्षात घेतला तर हेच लक्षात येते. किंबहुणा निवडणुकीच्या एक दोन महिन्याअगोदर पासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात व्हायची. पण या वेळेस निवडणूक अगदी टप्प्यात येऊनही येथे शांतताच दिसत आहे. येथे ऐन निवडणुकीच्या वेळी शांतता असल्याचे कारण म्हणजे नागभीडमध्ये नगरपंचायत अस्तित्वात येईल की नगरपालिका होईल, याबाबतची संभ्रमावस्था आहे. राज्य शासनाच्या एका धोरणात्मक निर्णयानुसार नागभीडला नगरपंचायतीचा दर्जा मिळणारच आहे. पण १५ जूनच्या नगरविकास विभागाच्या एका निर्णयानुसार नागभीड नगरपरिषदेची उद्घोषणाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. आणि यावर आक्षेप घेण्याची मुदत १४ जुलै रोजी संपत आहे.एकीकडे निवडणूक आयोगाने आपल्या कार्यक्रमानुसार येथील ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम घोषित केला असला तरी या निवडणुकीबद्दल इच्छुकांत फारसा उत्साह दिसून येत नाही. औपचारिकता म्हणून ते नामनिर्देशन दाखल करतीलही. पण ते तेवढ्यापुरतेच. कारण चार महिन्याअगोदर गडचिरोली जिल्ह्यात अशाच प्रकारे तेथील तालुका स्थळांचा निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला. इच्छुकांनी नामनिर्देशन दाखल केले. प्रचार केला आणि ऐन निवडणुकीच्या आदल्या दिवशी नगरपंचायतीची घोषणा करुन ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यात आली.नेमकी हीच वेळ नागभीडवर येऊ शकते, असे येथील अनेक इच्छुकांना वाटत आहे. किंवा निवडणुक पार पडल्यानंतर चार सहा महिन्यानंतरही ही वेळ येणारच आहे. मात्र औटघटकेच्या कालावधीसाठी कशाला वेळ आणि पैशाचा अपव्यय करायचा, अशी विचारधारा येथील बहुतेक इच्छुकांत सुरु असून नगर परिषद किंवा नगरपंचायत घोषित झाल्यानंतरच काय तो दम दाखवू, असे येथील इच्छुकांत बोलले जात आहे.मात्र दुसरीकडे तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र या निवडणुकीची चांगलीच धामधुम सुरु आहे. एकूण ६५ पैकी ४८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका यावेळी होत आहेत. त्यामुळे तालुक्यात सार्वत्रिक निवडणुकीचे चित्र निर्माण झाले आहे. निवडणूक गावात होत असली तरी गावातील कार्यकर्त्यांचे तालुक्यातील नेत्यांशी संबंध असल्याने गावस्तरावरील कार्यकर्ते आपल्या वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करीत असल्याचे चित्र अनेकदा अनुभवास येत आहे. तालुक्यातील नेतेही आपले कार्यकर्ते कुठे कमी पडू नयेत यासाठी सूचना देत आहेत. (तालुका प्रतिनिधी)या ग्रामपंचायतीकडे लक्षआरक्षणावरुन गोंधळ निर्माण झालेल्या मौशी कोर्धा, त्रिकेश्वर या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांकडे अनेकांचे लक्ष वेधले आहे. या गावातील सरपंचपद हे विशिष्ट प्रवर्गासाठी आरक्षित असले तरी या प्रवर्गाचे सदस्यपद या गावात आरक्षित नाही. या गावातील सरपंचपदी विराजमान होणाऱ्या व्यक्तीला खुल्या प्रवर्गातूनच निवडणून यावे लागणार आहे.आॅनलाईनबद्दल उत्सुकतायावेळी ग्रामपंचायत निवडणुकीचे नामांकण प्रथमच आॅनलाईन भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात याबद्दल उत्सुकता दिसत आहे. आॅनलाईन फार्म भरणे असल्यामुळे इंटरनेट कॅफेंना सुगीचे दिवस आहेत.