पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पाला लागलेले उदासीनतेचे ग्रहण सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 10:02 PM2019-08-11T22:02:12+5:302019-08-11T22:05:09+5:30

माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या कोरपना तालुक्यातील निसर्गरम्य पकडीगुडम सिंचन प्रकल्प शासनाच्या उदासीनतेमुळे विकासापासून दुर्लक्षित पडला आहे.

The depression in the Pachiguddam Irrigation Project does not eclipse | पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पाला लागलेले उदासीनतेचे ग्रहण सुटेना

पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पाला लागलेले उदासीनतेचे ग्रहण सुटेना

Next
ठळक मुद्देकेवळ दुर्लक्ष : प्रकल्प सुरक्षाही रामभरोसे

जयंत जेणेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरपना : माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या कोरपना तालुक्यातील निसर्गरम्य पकडीगुडम सिंचन प्रकल्प शासनाच्या उदासीनतेमुळे विकासापासून दुर्लक्षित पडला आहे.
कोरपना व जिवती तालुक्याच्या अगदी सीमारेषेवर असलेला हा सिंचन प्रकल्प दोन्ही तालुक्याच्या शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याच्या सोयीच्या दृष्टीकोनातून वरदान आहे. मात्र या सिंचन प्रकल्पातील गाळ गेल्या अनेक वर्षांपासून उपसण्यात आला नाही. त्यामुळे येथे मोठया प्रमाणात गाळ साचला गेला आहे. या सिंचन प्रकल्प अंतर्गत दोन कालवे आहेत. मात्र दोन्ही कालवे अस्वच्छतेने बरबटले गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या बांधावर अनेकदा पाणी पोहोचतच नाही. वनसडीकडून लोणीकडे जाणारा कालवा गेल्या कित्येक वर्षांपासून बुजला व फुटला गेला आहे. परंतु त्याच्या दुरुस्ती व स्वच्छतेकडे आजगायत दुर्लक्ष होत आहे. सिंचन प्रकल्पाच्या वेस्टवेअरलाही बºयाच ठिकाणी छोटी-मोठी गळती लागली आहे. त्यावर त्वरित उपाययोजना होणे गरजेचे आहे. याठिकाणी कुठला सुरक्षारक्षकही तैनात नसल्याने प्रकल्प सुरक्षाही रामभरोसे पडली आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबतीत शासनाची उदासीनताच कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे.
पर्यटनदृष्ट्या विकास नाही
हा प्रकल्प माणिकगड पहाडाच्या अगदी लगत असल्याने, हा संपूर्ण भाग निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. या स्थळाचा पर्यटन दृष्टीने विकास केल्यास येथील पर्यटन फुलून विकास साधला जाईल. स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होईल. तसेच या माध्यमातून शासनालाही पर्यटनातून महसूल प्राप्त होईल.
सदनिका दुर्लक्षितच
पकडीगुड्डम सिंचन प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाºयासाठी साधारणता २८ वर्षांपूर्वी चंद्रपूर- आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोनुर्ली येथे सुसज्ज वसाहत तयार करण्यात आली. परंतु निर्मितीची अनेक वर्ष लोटूनसुद्धा आजपर्यंत वसाहतीत कुणीही वास्तव्यास आले नसल्याने सदर सदनिका आजही ओस पडल्या आहेत. परिणामी इमारतीचीही बरीच नासधूस झाली आहे. यातील तारेचे कंपाऊंड, दारे, खिडक्या व अनेक साहित्यही चोरटयांनी लंपास केले आहेत. परंतु याचीही देखभाल व सुरक्षा वाऱ्यावरच आहे.
प्रकल्प पकडीगुड्डमला कार्यालय गडचांदूरला
कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम हा मध्यम सिंचन प्रकल्पात गणला जातो. मात्र या प्रकल्पाचे कार्यालय वनसडी किंवा कोरपना या जवळच्या ठिकाणी असणे गरजेचे असताना २० किलोमीटर अंतरावरील गडचांदूर येथे आहे. त्यामुळे येथून या प्रकल्पाचा कारभार सांभाळणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकलण्यासारखेच ठरत आहे. तसेच या प्रकल्पाला पूर्ण वेळ अभियंता नसल्याने एकाच अभियंत्याच्या भरोश्यावर अमलनाला व पकडीगुड्डम प्रकल्पाचा कारभार सुरू आहे. तसेच येथील कार्यालयीन कर्मचारी संख्याही बोटावर मोजण्याइतपतच आहे. त्यामुळे रिक्त पदे भरणेही आवश्यक आहे.

Web Title: The depression in the Pachiguddam Irrigation Project does not eclipse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण