फुटपाथवर वाहन आडवे
चंद्रपूर : महानगरपालिकेने पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्त्याच्या बाजूला फुटपाथ तयार केले आहे. मात्र अनेक ठिकाणी या फुटपाथवर व्यावसायिकांनी व वाहनधारकांनी अतिक्रमण करून ठेवले आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
जड वाहतूक बंद करावी
चंद्रपूर : गंजवॉर्डमध्ये भाजी तसेच धान्य बाजार आहे. गंजवॉर्डामध्ये सरदार पटेल कॉलेज, खासगी दवाखाने, बँकासुद्धा आहेत. याच परिसरात विविध शाळा तसेच कार्यालयेही आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी जड वाहने रस्त्यावर ठेवण्यावर तसेच वाहतुकीवर बंदी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अपघातग्रस्त स्थळांवर फलक लावा
चंद्रपूर : शहरातील प्रवण स्थळांवर फलक नसल्याने अपघाताचा धोका आहे. या स्थळांवर फलक लावण्याची मागणी होत आहे. मनपा तसेच बांधकाम विभागाने त्वरित लक्ष देऊन फलक लावणे गरजेचे आहे.
अन्नपदार्थांची उघड्यावर विक्री
चंद्रपूर : शहरात काही ठिकाणी अस्वच्छतेच्या वातावरणात अन्नपदार्थाची विक्री केली जात आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्यामुळे घाईगडबडीमध्ये नागरिक मिळेल तिथून खरेदी करीत आहेत.