सिंदेवाही : येथील रेल्वे स्थानक जिल्ह्यातील ब्रॉडगेज रेल्वे लाईनवरील मध्यवर्ती रेल्वे स्थानक आहे. मात्र रेल्वे उड्डाणपुल नाही. अनेकदा रेल्वे फाटक बंद असते. परिणामी, उड्डाणपुलाअभावी प्रवाशांना फाटक राहावे लागते. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर उड्डाणपुल बनविण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
जडवाहतुकीवर आळा
घालण्याची मागणी
घुग्घुस : वणी मार्गावर जडवाहतूक मोठ्या संख्येने सुरु आहे. त्यामुळेअपघात होतात. याच मार्गावर वेकोलिच्या कोळसा खाणी आहेत. त्यामुळे कामगारांची या रस्त्यावर ये-जा सुरू असते. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करून जडवाहतुकीवर आळा घालण्याची मागणी नागरिकांनी केली.
तुकूम परिसरातील
पथदिवे बंद
चंद्रपूर : तुकूम परिसरातील अनेक पथदिवे बंद आहेत. त्यामुळे नागरिकाना अंधाराचा सामना करावा लागतो. परिसरातील नागरिकांनी याबाबत अनेकदा तक्रार केल्या. मात्र अद्याप स्थिती बदलली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
कन्हाळगाव- आवडढोडी
रस्त्याची दुरवस्था
सिंदेवाही : तालुक्यातील ३० किमी अंतरावर असलेल्या कन्हाळगाव येथील रस्ता व आवडढोडी नाल्यावरील जीर्ण अवस्थेत असलेल्या पुलावरील रस्ता पूर्णपणे उखडला आहे. याचा नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.
रस्त्याअभावी
पेंढरी मक्तावासी त्रस्त
सावली : तालुक्यातील पेंढरी (मक्ता) या गावात स्मशानभूमीकडे जाण्यासाठी मार्ग नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोर जावे लागत आहे. पेंढरी मक्ता गावातील स्मशानभूमी गावापासून एक किमी अंतरावर आहे. अनेक वर्षांपासून स्मशानाकडे जाण्यासाठी मार्ग नाही. या मार्गावर शेतकºयांच्या जमिनी असल्याने अडचणी येतात. त्यामुळे पेंढरी मक्ता येथील स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता करण्याची मागणी नागरिकांनी केली.
महामार्गावरील प्रवासी
निवाºयांची दुरवस्था
चंद्रपूर : चंद्रपूर-आदिलाबाद राज्य महामार्गावरील गावाकडे जाण्याºया रस्त्यावरील प्रवासी निवाºयाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना झाडांचा आश्रम घ्यावा लागत आहे.या प्रवाशी निवाºयाची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
नवीन वस्त्यांमध्ये
वाढीव वीज खांब उभारावे
चंद्रपूर : येथील नवीन वस्तीमध्ये पथदिव्यांची आवश्यकता आहे.मात्र, वीज खांबच न उभारल्याने नागरिकांना विजेविना राहावे लागत आहे. पथदिवे नसल्याने तुकूम परिसराला लागून असणाºया नवीन वस्त्यांमध्ये अंधार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
अनियंत्रित वाहनांवर
कारवाई करा
चंद्रपूर : तुकूम परिसरातून कोळसा, राख, रेती व अन्य साहित्याची वाहतूक करणारे अनेक ट्रक ये-जा करतात. मात्र या ट्रकचे चालक भरधाव वेगाने ट्रक चालवत असून रस्त्याच्या वळणावरही वाहनाचा वेग कमी करत नाहीत़ शहरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
पीक विम्याच्या
रकमेची प्रतीक्षा
नागभीड : तालुक्यातील शेकडो कर्जदार व बिगर कर्जदार शेतकºयांनी खरीप पीक विमा काढला होता. पण, विम्याची रक्कम अद्याप मिळाली नाही. पावसामुळे धानाचे पीक वाया गेले होते. उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकरी अडचणीत आहे. प्रशासनाने विम्याची रक्कम देण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.
कन्हाळगाव येथील
रस्त्याची दुरवस्था
सिंदेवाही : तालुक्यातील ३० किमी अंतरावर असलेल्या कन्हाळगाव येथील रस्ता व आवडढोडी नाल्यावरील जीर्ण अवस्थेत असलेल्या पुलावरील रस्ता पूर्णपणे उखडला आहे. याकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांच्या जिविताला धोका निर्माण झाला आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.