शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी! ब्रह्मपुरी नवीन जिल्हा व्हावा का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 15:20 IST

नागरिकांना प्रतीक्षाच : चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन होणार की नाही?

रवी रणदिवे लोकमत न्यूज नेटवर्क ब्रह्मपुरी : सध्या सोशल मीडियावर २१ नवीन जिल्हे होण्याच्या मागणीला उधाण आले आहे. या मागणीला शासन स्तरावर कितपत सत्यता आहे, हे जरी कळले नसले तरी ब्रह्मपुरी जिल्ह्याच्या मागणीला पुन्हा एकदा पेव फुटले आहे. ब्रह्मपुरी परिसरातील नागरिकांनी वारंवार ही मागणी रेटून धरली आहे. मात्र अजूनही शासन याकडे सकारात्मक बघत नसल्याने या मागणीचे भिजत घोंगडेच आहे.

१९८२ पासून ब्रह्मपुरी जिल्ह्याची मागणी केली जात आहे. गडचिरोली जिल्हा होताना ब्रह्मपुरीचे नाव अग्रक्रमावर होते. परंतु रात्री नाव बदलून गडचिरोली जिल्हा नव्याने घोषित करण्यात आला होता. ब्रह्मपुरी हे ठिकाण चंद्रपूर जिल्ह्याच्या टोकावर असून १२५ किलोमीटर अंतरावर आहे. नागरिकांना शासकीय व निमशासकीय कामकाजाकरिता मोठ्या पल्ल्याचा सामना करावा लागत आहे. या गैरसोयीची दखल घेऊन चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करण्यात यावे व नव्याने ब्रह्मपुरी जिल्हा घोषित करण्यात यावा, ही मागणी गेली अनेक वर्षांपासून रेंगाळत आहे. या मागणीसाठी प्रसंगी आंदोलने चक्काजाम, ब्रह्मपुरी बंद, मुंडण आंदोलन, अशा प्रकारचे आंदोलन करूनसुद्धा शासन स्तरावर कुठल्याही हालचाली झाल्या नाही. प्रसंगी या साऱ्या प्रकारामुळे ब्रह्मपुरीकर निराश झाले. ६० किमी अंतरावर आहे ब्रह्मपुरीपासून गडचिरोली शहर. त्यामुळे जिल्हा न झाल्यास ब्रह्मपुरी गडचिरोली जिल्ह्यात समाविष्ट करावे.

ब्रह्मपुरी सर्व प्रकारे जिल्ह्यासाठी अनुकूल ब्रह्मपुरी हे ठिकाण शैक्षणिक, आरोग्य विषयक, व्यापार, दळणवळण, इमारती, खुली जागा या सर्व वैशिष्ट्याने जिल्ह्यासाठी सज्ज आहे. तरी ब्रह्मपुरीला वारंवार जिल्ह्याच्या यादीतून वगळले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. ब्रह्मपुरीपेक्षा छोट्या शहराला यापूर्वी जिल्हे म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र ब्रह्मपुरीवर राजकीय उदासीनता दिसून येत आहे.

जिल्ह्यासाठी प्रतीक्षा अजूनही कायम ब्रह्मपुरी जिल्ह्यासाठी अजूनही प्रतीक्षा कायम आहे. येथील काही नागरिकांनी एकत्र येऊन कृती समिती निर्माण करून पुन्हा लढा देण्याविषयी चर्चा केल्या जात आहे. अभी नहीं तो कभी नही, असाही नारा दिला जात आहे. सोशल मीडियावरची पोस्ट पाहून पुन्हा ब्रह्मपुरीकर सक्रिय होण्याच्या तयारीत आहेत. जुन्या मागणीला नवीन ताकद देऊन जिल्ह्यासाठी लढा कायम ठेवण्याचा निर्धार जिल्हा निर्माण कृती समितीने केला आहे.

 

 

  • ब्रह्मपुरी जिल्हा जर होत नसेल तर ब्रह्मपुरी तालुका हे ठिकाण गडचिरोली जिल्ह्यात समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. 
  • ब्रह्मपुरीपासून चंद्रपूर १२५ 3 किलोमीटर तर गडचिरोली फक्त ६० किलोमीटर अंतरावर आहे. तसेच वाहतूक व दळणवळणाच्या दृष्टीने गडचिरोली हे ठिकाण सोयीचे आहे. चंद्रपूरला जाण्यासाठी लागणारा वेळ व गडचिरोलीला जाण्यासाठी लागणारा वेळ याच्यात निम्मा वेळ लागत असून वेळ व पैशाची ही बचत होते. 
  • ब्रह्मपुरी तालुक्याला गडचिरोलीत समाविष्ट केल्यास नागरिकांना समाधान वाटेल.

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरbramhapuri-acब्रह्मपुरी