शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

पुण्यापाठोपाठ चंद्रपूरचेही चांदागड करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 2:15 PM

पुण्याचे नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने रेटली आहे. त्यापाठोपाठ आता गोंड राजाची राजधानी असलेल्या चंद्रपूरचेही मूळ नाव चांदागढच करावे, अशी मागणी आदिवासी संघटनांकडून पुढे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देआदिवासी अस्मितेचा प्रश्न चंद्रपूर होती गोंड राजाची राजधानी चांदागढ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याचे नाव बदलून जिजापूर करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने रेटली आहे. त्यापाठोपाठ आता गोंड राजाची राजधानी असलेल्या चंद्रपूरचेही मूळ नाव चांदागढच करावे, अशी मागणी आदिवासी संघटनांकडून पुढे करण्यात आली आहे.उत्तर प्रदेश सरकारने अलाहाबादचे नाव बदलण्याची भाषा करताच देशभरात चर्चा सुरू झाली. शहरांची नावे बदलण्याची मोहीमच सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले. त्यातच संभाजी ब्रिगेडने पुण्याचे जिजापूर नामकरण सुचविले आहे. त्यापाठोपाठ आदिवासी संघटनांनी आता चंद्रपूर शहराचे नाव चांदागढ करण्याची मागणी पुढे केली आहे.पूर्वी चांदागढचे गोंड राज्य होते. इंग्रजांनी चांदागढावर आक्रमण करून हे राज्य ताब्यात घेतले. प्रशासकीय कामासाठी १८५९ मध्ये चांदा जिल्ह्याची निर्मिती केली. त्यात मुल, वरोरा, ब्रम्हपुरी या तीन तालुक्यांची निर्मिती करून समावेश केला. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ११ जानेवारी १९६४ रोजी चांदाचे नामांतर चंद्रपूर असे करण्यात आले. त्यासाठी शासन निर्णय क्र. एन.एम.सी.१०६३ बी निर्गमित करण्यात आला होता. त्याचप्रमाणे बल्लाळसिंह या गोंड राजाच्या नावावरून त्याच्या राजधानीला बल्लारशहा असे नाव होते. आज त्या शहराला बल्लापूर नावाने ओळखले जाते.गोंडवाना एक्सप्रेसचे नाव का बदलले?ज्या पद्धतीने नावे बदलली जात आहे किंवा बदलण्याची मागणी होत आहे, त्याचा फटका प्राचीन गोंडवाना साम्राज्यातील शहरे, रेल्वेस्थानक व रेल्वेगाड्यांच्या नावांना बसत आहे. गोंडवाना या अस्मिताप्रधान शब्दालाही फटका बसत असल्याची खंत बिरसा क्रांतीदलाने व्यक्त केली आहे. भोपाळमधील बैरागढ रेल्वेस्थानकाचे नाव बदलून हिरदाराम करण्यात आले. ३१ मार्च २०१३ रोजी हजरत निजामुद्दीन जबलपूर गोंडवाना एक्सप्रेसचे नाव व नंबरसुद्धा बदलविण्यात आला आहे. पूर्वी १२४११ व १२४१२ या दोन क्रमांकाच्या रेल्वे हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस या नावाने जबलपूरपासून दिल्लीपर्यंत धावत होत्या. आता मात्र या गाडीचा नंबर २२१८१, २२१८२ असा करण्यात आला. जबलपूर हजरत निजामुद्दीन सुपर एक्सप्रेस असे नामांतर करून गोंडवाना शब्द वगळण्यात आला आहे. त्यामुळे गोंडवानातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यातील आदिवासी समाजात रोष आहे.गौरवशाली इतिहासाचे विस्मरणनावे बदलण्याच्या प्रक्रियेत आदिवासींचा गौरवशाली इतिहास पुसला जात आहे. गढामंडला, चांदागढ, देवगढ, खेरलागढ या ठिकाणी गोंड राजाची राज्ये होती. आज त्यांचीच ओळख पुसली जात आहे, अशी खंत आदिवासी अभ्यासक प्रमोद घोडाम यांनी व्यक्त केली.रेल्वे मंत्रालयाशी पत्रव्यवहार करुन गोंडवाना एक्सप्रेस नाव बदलल्याबाबत जाब विचारला जाईल. गोंडवाना एक्सप्रेस आणि चंद्रपूरबाबत बिरसा क्रांती दल देशभर जनआंदोलन उभे करेल.- दशरथ मडावी,राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष, बिरसा क्रांतीदल

टॅग्स :agitationआंदोलन