शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतील पारितोषिक प्राप्त चित्ररथ साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेने नेणार : सुधीर मुनगंटीवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 16:00 IST

मुनगंटीवार यांच्या भेटीने गोंधळी समाजबांधव भारावले

चंद्रपूर : नवीदिल्लीतील प्रजासत्ताक दिनी द्वितीय पारितोषिक मिळविलेला महाराष्ट्राचा "साडेतीन शक्तीपीठे आणि नारीशक्ती" हा चित्ररथ राज्यातील साडेतीन शक्तीपीठांवर रथयात्रेच्या माध्यमाने नेण्यात येईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. 

दिल्लीतील चित्ररथासोबत कर्तव्यपथावर संचलनात गोंधळ सादर करण्यात आला होता. दिल्लीतील संचलनात गोंधळी समाजाला प्रथमच संधी मिळाली त्याबद्दल अखिल भारतीय गोंधळी समाज संघटनेने ना. सुधीर मुनगंटीवार यांचा आज मंत्रालयात सत्कार केला, त्याप्रसंगी ते बोलत होेते. ते पुढे म्हणाले की, आत्तापर्यंत दिल्लीच्या कर्तव्य पथावर जे चित्ररथ दिसले ते फक्त टीव्हीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला दिसले. त्यामुळे माहूरची रेणुका माता, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि वणीची सप्तश्रृंगी माता या साडेतीन शक्तीपीठांच्या ठिकाणी रथयात्रेच्या माध्यमातून हा चित्ररथ नेण्याचा निर्णय घेतला आहे.

मुनगंटीवार यांनी पुढे सांगितले की गोंधळी समाजामध्ये असणारे जे जे लोककलावंत आहेत ज्यांनी ज्यांनी या समाजाला प्रगत करण्यामध्ये, उन्नत करण्यामध्ये सामाजिक जाणीव ठेवून समरसता निर्माण केली त्या सर्वांच्या पाठीशी शासन म्हणून आम्ही खंबीरपणे उभे आहोत. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या कर्तव्य पथावर महाराष्ट्राच्या वतीने सादर केलेल्या "साडेतीन शक्तिपीठे व नारीशक्ती" या चित्ररथाला त्यासोबत सादर केलेल्या गोंधळाच्या सादरीकरणाने अधिकच उठाव आला, असेही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. या चित्ररथाला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देखील प्राप्त झाले आहे. 

साडेतीन शक्तीपीठांच्या या चित्ररथाच्या माध्यमातून गोंधळी समाजाला प्रथमच दिल्लीतील कर्तव्य पथावर जाण्याची संधी मिळाली म्हणून उपस्थित समाज बांधवांनी यावेळी सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आणि मानाचा फेटा बांधून त्यांचा सन्मान केला. 

यावेळी मुनगंटीवार यांनी उपस्थित गोंधळी समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांची व्यक्तिगत चौकशी करत संवाद साधला. मुनगंटीवार यांच्या या भेटीमुळे गोंधळी समाज बांधव भारावून गेल्याचे दिसले. या बैठकीदरम्यान अखिल भारतीय गोंधळी समाज कार्याध्यक्ष राजेंद्र अण्णाराव वनारसे, कर्नाटक गोंधळी समाज प्रदेशाध्यक्ष सिद्राम दादाराव वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

टॅग्स :SocialसामाजिकSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार