शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

पिके उद्ध्वस, श्वसनाचे आजारही वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:01 IST

रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुपीक शेती आहेत. वरोरा ते चिमूर मार्गालगत संपूर्ण वाहिती जमीन आहे. या वाहिती जमनीवर सध्या कपाशी व तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. रस्त्यावरील वाहनामुळे उडणारी धूळ पिकावर बसत आहे. धूळ पिकावर घट्ट बसत असल्याने त्यातून सूर्यकिरण जात नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. याचा फटका चिमूर व वरोरा तालुक्यातील शेकडो हेक्टर सुपीक जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे.

ठळक मुद्देरस्त्यावरील धुळीचे जीवघेणे इफेक्ट : दोन वर्षांपासून सुरू आहे वरोरा-चिमूर रस्त्याचे सिमेंटीकरण

प्रवीण खिरटकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : मागील दोन वर्षांपासून वरोरा - चिमूर मार्गाचे सिमेंटीकरण करणे सुरू आहे. काम कासवगतीने सुरू असून अद्याप काम अर्धवटच झाले आहे. यामुळे अपघातात वाढ झाली आहे. रस्त्यावरील धुळीमुळे शेतातील पिके तर करपलीच, सोबतच परिसरातील नागरिकांना श्वासनाचे आजार जडत असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व बाबींस रस्त्याचे काम करणारी कंपनी जबाबदार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे प्रशासन कंपनीवर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.वरोरा चिमूर मार्गाचे सिमेंटीकरण करणे मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. काम अत्यंत संथगतीने होत असून अनेक ठिकाणी दर्शनी फलक दिसून येत नाही. कुठेही सुरक्षिततेची काळजी घेण्याचे संदेश असणारे फलकही नसल्याने या रस्त्यावर अपघातांची मालिका दिवसागणिक वाढत आहे. यामध्ये अनेक व्यक्ती मृत्यू पावले तर काही गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहै. रस्त्याच्या दुतर्फा सिमेंट नाल्याचे बांधकाम करीत आहे. तेही बांधकाम अर्धेच झाल्याने नालीमध्ये पाणी साचून अनेक पाळीव प्राण्यांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहे. मात्र याची दखल कुणीही घेतली नाही.पिकांची वाढ खुंटलीरस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सुपीक शेती आहेत. वरोरा ते चिमूर मार्गालगत संपूर्ण वाहिती जमीन आहे. या वाहिती जमनीवर सध्या कपाशी व तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात आहे. रस्त्यावरील वाहनामुळे उडणारी धूळ पिकावर बसत आहे. धूळ पिकावर घट्ट बसत असल्याने त्यातून सूर्यकिरण जात नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. याचा फटका चिमूर व वरोरा तालुक्यातील शेकडो हेक्टर सुपीक जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना बसला आहे. यासोबतच फुटलेल्या कपाशीवर बसत असल्याने कपाशीची प्र्रतवारी खराब होवून कवडीमोल भावाने शेतकऱ्यांना कापूस पिकावा लागत आहे. तूर पिकावरही धूळ मोठ्या प्रमाणात बसत असल्याने तूर उत्पादनातही घट होणार असल्याचे मानले जात आहे. आधीच शेतकरी अनेक संकटांना सामना करीत असताना आता धुळीचाही त्यांना सामना करावा लागत असल्याने शेतकऱ्यांच्या संकटातही भर पाडली आहे. गुरे हिरवा चारा सध्या खात आहे, या हिरव्या चाऱ्यावर धूळ असल्याने पाळीव जनावरांचे आरोग्य धोक्यात असल्याचे दिसून येत आहे. कोटधुळीमुळेच श्वसनाच्या रूग्णात वाढवरोरा-चिमूर मार्गालगत मोठ्या प्रमाणात वस्त्या आहेत. रस्त्यावरील धूळ वाहनाने उडून थेट घरामध्ये शिरत आहे. धूळ पाण्यावरही बसत आहे. त्यामुळे वरोरा-चिमूर परिसरात दिवसागणिक वाढ होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हवेत उडणारी धूळ परिसारतील नागरिकांच्या श्वसनाने शरीरात जात आहे. त्यामुळे श्वसन संस्थेवर मोठ्या प्रमाणत विपरित परिणाम होवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये कफ, खोकला, सर्दी व घश्याचे दुखणे, वारंवार शिंका येणे, अस्थमाच्या रुग्णांचा तर आणखी त्रास वाढला आहे. एकंदरीत वरोरा-चिमूर मार्गावरील वाहनांमुळे उडत असलेली धूळ नागरिकांना चांगलीच महागात पडत असल्याचे दिसून येत आहे. धूळ पाण्यात पसरत असते व तेच पाणी पिण्यात येत असल्याने नागरिकांच्या आजारात वाढ होत आहै. असे असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने व रस्ता बांधकाम करणारी कंपनी कुठलीही उपाययोजना करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उडणाºया धुळीबाबत ओरड झाल्यास रस्ता बांधकाम करणारी कंपनी टँकरद्वारे काही दिवस पाणी मारीत असते. यापलिकडे काहीही उपाययोजना होत नाही.रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या शेतातील पिकांची पाहणी केली असता पिकावर रस्त्यावरील धूळ मोठ्या प्रमाणात साचली असल्याने पीक सूर्यकिरण मिळत नसल्याने पिकाची वाढ खुंटून उत्पादनात घट होणार आहे व फुटलेल्या कापसाची प्रतवारी खराब झाल्याचे दिसून येत आहे.-व्ही. आर. प्रकाशतालुका कृषी अधिकारी, वरोरा.मागील काही महिन्यांपासून वरोरा परिसरातील शेगाव, चारगाव आदी गावातील नागरिकांना श्वसनाचे आजार जडत असल्याचे दिसून आले आहे. रस्त्यावरील धूळ श्वसनाच्या आजाराला कारणीभूत आहे. यासोबतच चिमूर-वरोरा मार्गावर अपघात झालेल्या जखमी रूग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. अनेक अपघातग्रस्त रूग्ण शासकीय रूग्णालयात उपचार घेण्याकरिता येत आहेत.-डॉ. बी. बी. मुंजनवारवैद्यकीय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र, शेगाव.

टॅग्स :agricultureशेती